पू. (कु.) दीपाली मतकर यांचा साधनाप्रवास आणि संत-सन्‍मान सोहळा !

‘भाव तिथे देव’ ही उक्ती सार्थ ठरवणार्‍या पू. दीपाली मतकर ! पू. दीपालीताईंचा साधनाप्रवास पहाता ही गोष्ट अधिकच प्रकर्षाने जाणवते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सतत अनुसंधानात रहाणार्‍या पू. दीपालीताई यांची आरंभी व्यष्टी प्रकृती होती.

अखंड नामजप, तसेच चिकाटीने व्यष्टी अन् समष्टी साधना करणार्‍या ईश्वरपूर (जि. सांगली) येथील श्रीमती वैशाली मुंगळे संतपदी विराजमान !

श्रीरामाचा अखंड नामजप करून त्याद्वारे इतरांना नामजपाची गोडी लावणार्‍या आणि चिकाटीने व्यष्टी अन् समष्टी साधना करणार्‍या ईश्वरपूर येथील श्रीमती मुंगळेआजी यांना ७ जुलै या दिवशी सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘संत’ म्हणून घोषित केले.

नम्र, परिपूर्ण सेवेचा ध्‍यास असलेले आणि सर्वांवर पितृवत् प्रेम करणारे श्री. अरविंद सहस्रबुद्धे (वय ७६ वर्षे) १२५ व्‍या संतपदी विराजमान !

पुणे येथील श्री. अरविंद सहस्रबुद्धे (वय ७६ वर्षे) पूर्वी नास्तिक होते. सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्यास आरंभ केल्यानंतर, तसेच सनातनच्या आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन केल्यानंतर त्यांची देवावर श्रद्धा बसली. प्रेमभाव आणि सहजता या गुणांमुळे सहस्त्रबुद्धेकाकांनी अल्पावधीतच सर्वांची मने जिंकली आहेत….

जिवंतपणा जाणवणारे आणि चैतन्याची अनुभूती देणारे नागोठणे (जिल्हा रायगड) येथील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे जन्मस्थान !

जन्मस्थानाच्या वास्तूला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी अत्यंत भावपूर्ण वंदन केले. संपूर्ण वास्तू आणि वास्तूच्या आजूबाजूचा परिसर पहातांना त्याविषयी त्या अतिशय जिज्ञासेने अन् बारकाईने जाणून घेत होत्या.

साधकांना स्वतःच्या स्थूल रूपात अडकू न देता त्यांना घडवणारे आणि ‘स्थुलातून सूक्ष्माकडे’ नेणारे अवतारी दिव्यात्मा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कसे घडवले, याविषयी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भावपूर्ण मनोगत !

उडुपी, कर्नाटक येथील ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्या यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहून सांगितलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये

श्री. जयतीर्थ आचार्या हे उडुपी, कर्नाटक येथील ज्योतिषी आहेत. ‘राघवेंद्र स्वामी उडुपी मठा’चे ते व्यवस्थापक आहेत. वर्ष १९९६ पासून गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ते ज्योतिष विषयाचा अभ्यास करत आहेत. ९.४.२०२३ या दिवशी श्री. जयतीर्थ यांची मी भेट घेतली.

सतत इतरांचा विचार करणार्‍या रत्नागिरी येथील सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला खेरआजी (वय ९० वर्षे) यांचा साधनाप्रवास !

पू. आजींच्या घरातील वातावरण आध्यात्मिक होते आणि त्यांनाही अध्यात्माची आवड होती. त्यांना ‘स्तोत्रे म्हणणे आणि देवळात जाणे’ लहानपणापासून आवडायचे.

पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या संतसन्मान सोहळ्यातील भावमोती !

फाल्गुन कृष्ण पक्ष सप्तमी या दिवशी पुणे जिल्ह्यातील सनातनच्या साधकांची ‘माऊली’ असणार्‍या सनातनच्या साधिका सौ. मनीषा महेश पाठक यांच्या रूपाने सनातनच्‍या समष्‍टी संतपदी १२३ वे संतपुष्प अर्पित झाले.

‘सनातन संस्थे’चे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या पत्नी प.पू. (श्रीमती) सुशीला दिनकर कसरेकर (वय ८६ वर्षे) यांचा खडतर साधनाप्रवास !

कै. जीजी यांचे बालपण, दिनकरशी झालेला त्यांचा विवाह, त्यांचे खडतर जीवन, त्यांचा स्वभाव, तसेच प.पू. भक्तराज महाराज यांच्यासारख्या अत्युच्च कोटीच्या संतांशी संसार करतांना अत्यंत धैर्याने त्यांनी केलेला संसार आणि त्यांचे आध्यात्मिक जीवन यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

धर्मकार्याची तीव्र तळमळ असलेले अधिवक्ता कृष्णमूर्ती यांनी गाठली ६४ टक्के, तर भगवंताविषयी अपार भक्ती असलेले सनदी लेखापाल श्री. सतीशचंद्र यांनी गाठली ६२ टक्के आध्यात्मिक पातळी !

गुरुदेवांविषयी अपार श्रद्धा आणि धर्मकार्याची तीव्र तळमळ असलेले अधिवक्ता कृष्णमूर्ती पी. यांनी ६४ टक्के तसेच नम्रता अन् भगवंताविषयी अपार भक्ती असलेले मंगळुरू येथील सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाऊंटंट) श्री. सतीशचंद्र यांनी ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे सनातनचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी भावपूर्ण वातावरणात घोषित केले.