सूक्ष्मातील प्रयोग

Article also available in :

येथे दिलेले ‘छायाचित्र अ’ आणि ‘छायाचित्र आ’ यांकडे पाहून मनाला काय जाणवते ? त्याचा अभ्यास करा !

 

प्रयोगाचे उत्तर !

‘छायाचित्र आ’मधील सात्त्विक दीपरचनेकडे पाहून विविध आध्यात्मिक अनुभूती येतात !

अलीकडे दीपावलीच्या कालावधीत दिव्यांच्या रचनांची अनेक छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत असतात. त्या सामान्य दीपरचना आणि सनातनच्या आश्रमात करण्यात आलेल्या देवतातत्त्व आकृष्ट करणार्‍या दीपरचना यांमध्ये भेद आहे. ‘छायाचित्र अ’प्रमाणे सामान्य दीपरचनाही मन वेधून घेते; परंतु त्याकडे आपण अधिक वेळ पाहू शकत नाही. असात्त्विक आकार, भडक रंग, एकमेकांत गुंतागुंत असलेली नक्षी यांमुळे केवळ कलात्मकतेसाठी केलेल्या अशा दीपरचनांकडे पाहून आध्यात्मिकदृष्ट्या त्रासदायक अनुभव येतात. ‘छायाचित्र आ’मध्ये सनातनच्या आश्रमात श्री सिद्धिविनायकाच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी केलेली जास्वंदीच्या फुलाच्या आकारातील दीपरचना आहे. या दीपरचनेकडे पाहून आध्यात्मिक स्तरावरील विविध अनुभूती येतात. गणपतितत्त्व आकृष्ट करणारी ही दीपरचना पाहून मनाला आनंद जाणवतो. त्यामुळे ‘तिच्याकडे पहातच रहावे’, असे वाटते. तसेच साधकांनी ही दीपरचना भावपूर्ण साकारल्याने आपला भावही जागृत होतो.

Leave a Comment