व्यायाम कधी करावा ?

सकाळी रिकाम्या पोटी व्यायाम करणे आदर्श आहे. त्यामुळे शक्यतो सकाळीच व्यायाम करावा; परंतु सकाळी वेळ न मिळाल्यास सायंकाळी व्यायाम करावा. जेवण झाल्यावर पोट हलके होईपर्यंत, म्हणजे साधारण ३ घंट्यांपर्यंत व्यायाम करू नये. व्यायामानंतर न्यूनतम १५ मिनिटांपर्यंत काही खाऊ-पिऊ नये

केवळ ‘आयुर्वेदातील औषधे खाणे’ म्हणजे आयुर्वेदानुसार आचरण नव्हे !

स्वतःच्या मनाने पुष्कळ काळ एखादे औषध घेत रहाणे चुकीचे आहे. निरोगी रहाण्यासाठी आयुर्वेदातील औषधे नियमित खाणे नव्हे, तर केवळ पाचच मूलभूत पथ्ये पाळणे आवश्यक असते.

चाळिशीनंतर गुडघे दुखू नयेत, यासाठी गुडघ्यांना नियमित तेल लावा !

कोणतेही खाद्य तेल किंवा औषधी तेल वापरल्यास चालते. रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर अंघोळीपूर्वी तेल लावावे. गुडघ्यांना लावलेले तेल न्यूनतम ३० मिनिटे रहायला हवे. नंतर धुतल्यास चालते – वैद्य मेघराज माधव पराडकर

मोकळेपणाने बोलणे हे एक मोठे औषध !

स्वभावदोषांमुळे बर्‍याच जणांना मोकळेपणाने बोलता येत नाही. काहींच्या मनामध्ये वर्षानुवर्षे पूर्वीचे प्रसंग आणि त्यांसंबंधीच्या भावना साठून राहिलेल्या असतात. मनामध्ये कोणत्याही प्रकारचे विचार साठून राहिले की, त्याचे पडसाद शरिरावर उमटतात आणि निरनिराळे शारीरिक त्रास चालू होतात

शरीर निरोगी राखण्यासाठी केवळ एवढेच करा !

नियमित व्यायाम केल्याने शारीरिक क्षमता वाढते. त्यासह मनाचीही क्षमता वाढते. नियमित व्यायाम करणार्‍याचे मन ताणतणाव सहन करण्यास सक्षम होते. व्यायाम करणार्‍याला वातावरणातील किंवा आहारातील पालट सहसा बाधत नाहीत.

शरीरस्वास्थ्यासाठी व्यायाम आवश्यक आहे !

केवळ चालणे, केवळ सूर्यनमस्कार किंवा केवळ प्राणायाम न करता स्वतःच्या क्षमतेनुसार प्रत्येक प्रकारातील व्यायाम थोडा थोडा करावा. असे नियमित केल्याने व्यायामाचा शरिरावर सुपरिणाम दिसायला लागतो.

रमत गमत चालणे म्हणजे व्यायाम नव्हे !

श्रम केल्यानेच शरिराची ताण सहन करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार थोडेफार श्रम होतील, अशा पद्धतीने व्यायाम करायला हवा.

पावित्र्याचे प्रतीक असलेले श्रीफळ, म्हणजेच नारळ !

‘नारळ हे उष्ण कटिबंधात होणारे फळ आहे. हिंदी आणि पॅसिफिक महासागर ही नारळ मिळण्याची मूळ स्थाने आहेत. नारळाला ‘दक्षिणेकडील फळ’, असे समजले जाते.

चिकनगुनिया : लक्षणे आणि उपचार !

‘चिकनगुनिया’ या व्याधीचे स्वरूप भयंकर असले, तरी ती जीवघेणी व्याधी नाही. ती बरी होते, तसेच सांधेदुखीही बरी होऊ शकते. केवळ योग्य वेळी वैद्य गाठण्याची आणि त्यांच्याकडे पुरेसा काळ उपचार करून घेण्याची आवश्यकता आहे.’