रमत गमत चालणे म्हणजे व्यायाम नव्हे !

‘आजकाल बरेच जण चालण्याचा व्यायाम करतात; परंतु काहींचे चालणे रमत गमत असते. बरेच जण चालतांना एकमेकांशी बोलतात. अशाने व्यायामाचे लाभ होत नाहीत. ‘शरीर-आयास-जनकं कर्म व्यायामः ।’ म्हणजे ‘शरिराला श्रम होईल, असे कर्म करणे, म्हणजे व्यायाम’, अशी व्यायामाची व्याख्या आहे. श्रम केल्यानेच शरिराची ताण सहन करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार थोडेफार श्रम होतील, अशा पद्धतीने व्यायाम करायला हवा. असे करतांना एकाएकी अधिक व्यायाम करणे टाळावे. हृदयासंबंधी विकार असलेल्यांनी आपल्या वैद्यांच्या समादेशाने (सल्ल्याने) व्यायाम करावा.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.८.२०२२)

Leave a Comment