शरद ऋतूत निरोगी रहाण्यासाठी हे करा !
‘पावसाळा संपल्या संपल्या सूर्याचे प्रखर किरण धरणीवर पडू लागतात, तेव्हा शरद ऋतूला आरंभ होतो.शरद ऋतूमध्ये सर्वाधिक विकार होण्यास वाव असतो, म्हणूनच ‘वैद्यानां शारदी माता ।’ म्हणजे ‘(रुग्णांची संख्या वाढवणारा) शरद ऋतू वैद्यांची आईच आहे’, असे गमतीत म्हटले जाते.