भारतीय आणि चिनी बिंदूदाबन पद्धतींची तुलना

भारतीय आणि चिनी बिंदूदाबन पद्धती

भारतात ५,००० वर्षांपूर्वीपासून असलेली बिंदूदाबन उपायपद्धत कालांतराने बौद्ध साधू आणि प्रवासी यांनी  चीन आणि जपान या देशांत पोहोचवले. चीन, जपान आणि कोरिया या देशांमध्ये ‘बिंदूदाबन’ (अ‍ॅक्युप्रेशर) अन् ‘बिंदूछेदन’ (अ‍ॅक्युपंक्चर) या उपायपद्धतींना मान्यता देण्यात आली. इतकेच नव्हे, तर या उपायपद्धतींना अधिकृत उपायपद्धतींचा स्तरही (दर्जाही) देण्यात आला.

या लेखात चीनी आणि भारतीय बिंदूदाबन पद्धतींची तुलना केली असून, अाध्यात्मिक विज्ञानाच्या साहाय्याने उत्पन्न झालेली भारतीय बिंदूदाबन पद्धत अधिक  सूक्ष्म स्तरावर कसे कार्य करते, हे विस्ताराने सांगितले आहे.

C2_320
१. चिनी बिंदूदाबन उपचार पद्धत

१ अ. यांग आणि यिन या शब्दांचे अर्थ 

यांग म्हणजे पुरुषत्व किंवा क्रियाधारणा मानली, तर यिन हे स्त्रीत्वाचे प्रतीक मानले जाते. म्हणजेच ढोबळ मानाने शरिरातील शक्तीप्रवाहाचे ‘उजवी बाजू म्हणजे पुरुष आणि डावी बाजू म्हणजेच स्त्री’, असे वर्गीकरण केले जाते.

१ आ. यांग आणि यिन नाड्या अन् दाबबिंदू
यांचा एकमेकांशी आणि शरिरातील अवयवांशी असलेला संबंध

१ आ १. शक्तीप्रवाहाच्या स्वरूपात अडथळा

डाव्या बाजूला अडथळा (वाईट शक्तींचा त्रास) : ‘डाव्या बाजूला शक्तीप्रवाहाच्या स्वरूपात अडथळा असेल, तर त्याला ‘अंधाराचा त्रास होत असेल’, म्हणजेच ‘वाईट शक्तींच्या स्वरूपातील अडथळा असेल’, असे अनुमान लावले जाते.

उजव्या बाजूला अडथळा (देवतेचा कोप) : उजव्या बाजूला वहाणार्‍या शक्तीप्रवाहात काही अडथळा आला असेल, तर त्याला स्थानानुसार ‘त्या त्या देवतेचा कोप असेल’, असे समजले जाते. त्यासाठी एखाद्या देवतेची, म्हणजेच प्रकाशाची उपासना करायला सांगितली जाते. (एखाद्या व्यक्तीची योग्य ती साधना करण्याची क्षमता असूनही व्यक्ती साधना करत नसेल, तर देवता तिच्यावर कोपते. तसेच काही क्षुद्रदेवता त्यांना द्यायचा उतारा न दिल्यास कोपतात.)

१ इ. यिन आणि यांग नाड्या अन् कुंडलिनीयोगातील नाड्या

  चीनी पद्धतीच्या यिन आणि यांग नाड्या कुंडलिनीयोगातील नाड्या
१. ‘संबंधित  योग’ शक्तीपात ज्ञान आणि ध्यान
२. अभ्यासाची प्रक्रिया देहातील शक्तीप्रवाहाचे पुरुषत्व आणि स्त्रीत्व असे वर्गीकरण अन् त्यांचा स्पर्शात्मक अभ्यास ज्ञानचक्षूंनी जाणलेले आणि पाहिलेले देहातील नाड्यांतील शक्तीप्रवाहांचे वहन, त्यांची गती अन् त्यांच्या चाक्रिक नियमनांचे ज्ञान ऋषींना असणे
३. ज्ञानाची निर्मिती वाईट शक्तींनी हस्तक्षेप करण्याचे प्रमाण जास्त असल्याने कनिष्ठ प्रकारच्या ज्ञानाची निर्मिती अनंत काळापासून शुद्ध चैतन्याद्वारे संक्रमित ऋषीनिर्मित ज्ञान असल्याने वाईट शक्तींनी हस्तक्षेप करण्याचा धोका अल्प (कमी) असणे

४. ज्ञानाची  व्याप्ती

अ.

 

आ.

देहातील केवळ उजव्या आणि डाव्या बाजूकडील शक्तीप्रवाहाविषयी प्रकाश अन् अंधार या संज्ञांद्वार स्थूल माहिती असणे

 

घटनेतील स्थूल कारण ओळखता येणे

 

तीन नाड्यांच्या शक्तीप्रवाहाचा संयोग, प्रत्येक नाडीच काय आणि नाडीतून चालू असलेल्या शक्तीप्रवाहाच्या वेगानुसार ओळखता येणारा योग, या सर्वांचे सखोल ज्ञान असणे

 

कार्यकारणभावासहित पिंडाचे आणि त्याच्या ब्रह्मांडाशी असलेल्या देवाणघेवाणयुक्त संबंधाचे ज्ञान होणे

५. ज्ञानाचा स्तर स्थूलातील सूक्ष्म सूक्ष्मातील सूक्ष्म
६. मर्यादा ‘दोनच प्रकारच्या शक्तींचे देहात वास्तव्य असते’, असे समजणे देहातील सूक्ष्मातीसूक्ष्म  ७२,००० नाड्या आणि त्यांचा नाद, त्यांतून उत्पन्न होणारी शक्ती अन् त्यांच्या परिणामांचे पिंड आणि ब्रह्मांड यांच्यावर पडणारा प्रभाव यांचे बारकाव्यासहित ज्ञान असणे
७. उपचारपद्धत देहाला स्पर्श करून शक्तीप्रवाहाच्या अंदाजाने शक्ती-संक्रमणातील अडथळा ओळखता येणे; परंतु ते निदान चुकण्याचीही शक्यता असणे देहाला स्पर्श न करता सर्वज्ञतेच्या स्तरावर विश्वमन आणि विश्वबुद्धी यांच्याशी एकरूप होऊन देहातील शक्तीप्रवाहातील अडथळ्यातील सूक्ष्मातीसूक्ष्म बिंदूही जाणता येणे अन् त्याची अनुभूती घेता येणे’

 

१ ई. भारतीय आणि चिनी बिंदूदाबन पद्धती

१ इ १. निदानाची पद्धत

भारतीय पद्धत : ‘ही पद्धत यिन आणि यांग या दोन्ही नाड्यांच्या, म्हणजेच बाजूंच्या अभ्यासापेक्षा जास्त सूक्ष्म आहे; कारण ती शक्तीप्रवाहातील त्या त्या बिंदूच्या स्थानी एकटवलेली अन् त्या त्या अवयवांतील पेशींना उद्दीपित करणाNया स्पंदनांचा अभ्यास करून तोच बिंदू दाबून त्यावरून त्या त्या अवयवांत निर्माण झालेल्या रोगाचे निदान करते.

चिनी पद्धत : हिच्यात एक प्रकारचे वरवरचेच निदान केले जाते.

१ इ २. निदानाची सखोलता

भारतीय पद्धत : या पद्धतीत नेमके त्या त्या अवयवांशी संबंधित त्याच बिंदूवर दाब देऊन त्या त्या संबंधित अवयवाला कार्यकारी उद्दीपना दिली जाऊन बिंदूस्वरूपातील जागृतीतून शक्तीप्रवाहातील अडथळाही नष्ट केला जातो.

चिनी पद्धत : या पद्धतीत अचूक आणि खोल निदान केले जात नाही.

१ इ ३. प्रत्यक्ष उपाय

भारतीय पद्धत : ही पद्धत त्या त्या अवयवात चेतना निर्माण करून त्या अवयवाचीच क्षमता वाढवून त्याच्या बळावर (जोरावर) त्याच्याच कार्याद्वारे त्याच्याच कार्यातील अडथळा दूर करते. बिंदूदाबन ही उपायपद्धत केवळ शारीरिक व्याधी (आजार) बरे करण्याची एक पद्धत नसून मानवी जीवनातील चेतनाशक्तीचे महत्त्व जाणून तिचे कार्य सुरळीत चालू रहाण्यासाठी दैनंदिन जीवनात प्रत्येक क्षणी काय करावे, हे शिकवणारे हे एक शास्त्र आहे. हे शास्त्र जाणून ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच ‘साधना’ होय.

चिनी पद्धत : या पद्धतीतून केवळ देहाची कोणती बाजू अशक्त आणि कोणती बाजू सशक्त आहे, एवढेच निदानाच्या स्वरूपात सांगितले जाते.

१ इ ४. लाभ

भारतीय पद्धत : ही पद्धत थेट देहातील अवयवाचाच वेध घेते.

चिनी पद्धत : या पद्धतीतील नाड्यांच्या अभ्यासात त्यांचा अवयवांशी तसा थेट संबंध येत नाही, तर ढोबळ मानाने केवळ देहातील त्या त्या बाजूशीच संबंध येतो.

संदर्भ : सनातन प्रकाशित ग्रंथ ‘शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी ‘बिंदूदाबन’