परसात किंवा बागायतीमध्ये लावता येण्याजोग्या औषधी वनस्पती

१. परसात किंवा बागायतीमध्ये लावता येण्याजोग्या औषधी वनस्पती

औषधी वनस्पतींमधील अनेक वनस्पतींचा वापर औषधांबरोबरच अन्य कारणांसाठीही होतो. काही औषधी झाडांना सुंदर फुले येतात. ती झाडे घराच्या अवतीभोवती, तसेच मार्गाच्या दोन्ही बाजूंनी लावल्यास परिसर सुशोभित होतो. पुष्कळ औषधी वनस्पतींची भाजी सुरेख होते. काही औषधी झाडांपासून फळेही मिळतात. काही कंदवर्गीय वनस्पतींचे कंद पोटभरीसाठीही खाता येतात. वृक्षवर्गीय वनस्पतींचा इंधनासाठीही उपयोग होतो. काही वनस्पतींपासून खाण्याचा डिंक, खाण्याचा रंग यांसारखे पदार्थ मिळतात. एकूणच औषधी वनस्पती या बहूपयोगी सिद्ध होतात.

१ अ. कुंपण म्हणून किंवा कुंपणाच्या कडेला लावता येण्याजोगी वनस्पती

वनस्पती लॅटिन नाव कोणत्या विकारांत उपयोगी ? औषधासाठी उपयुक्त अंग लागवडीसाठी उपयुक्त अंग
१. अडुळसा Justicia adhatoda उष्णतेचे आणि पित्ताचे सर्व विकार, श्‍वसनसंस्थेचे विकार पंचांग खोडाचे छाट

अडुळसा

१ आ. फुले

वनस्पती लॅटिन नाव कोणत्या विकारांत उपयोगी ? औषधासाठी उपयुक्त अंग लागवडीसाठी उपयुक्त अंग
१. कमळ Nelumbo nucifera रक्त आणि पित्त यांचे विकार कंद आणि बी बी किंवा कंद
२. शेवंती Chrysanthemum morifolium श्‍वसन आणि पचन या संस्थांचे विकार पाने आणि फुले बी किंवा खोडाचे छाट
३. सदाफुली Catharanthus roseus मधुमेह आणि कर्करोग पंचांग बी किंवा खोडाचे छाट

१ इ. फळे

वनस्पती लॅटिन नाव कोणत्या विकारांत उपयोगी ? औषधासाठी उपयुक्त अंग लागवडीसाठी उपयुक्त अंग
१. अननस Ananas comosus पचनाशी संबंधित विकार आणि कावीळ फळ फळावरील शेंडा

१ ई. भाजी

वनस्पती लॅटिन नाव कोणत्या विकारांत उपयोगी ? औषधासाठी उपयुक्त अंग लागवडीसाठी उपयुक्त अंग
१. अळू Colocasia esculenta पित्ताचे विकार पाने आणि कंद कंद
२. आंबटी Oxalis corniculata अपचन पाने बी
३. तांदुळजा Amaranthus spinosus भाजणे-पोळणे, पित्ताचे विकार, जुलाब आणि रक्तदोष पंचांग बी

१ उ. कंद

वनस्पती लॅटिन नाव कोणत्या विकारांत उपयोगी ? औषधासाठी उपयुक्त अंग लागवडीसाठी उपयुक्त अंग
१. रताळे Ipomoea batatas अशक्तपणा पंचांग बी
२. साबुकंद (टॅपिओका) Manihot esculenta अशक्तपणा पंचांग बी
३. सुरण Amorphophallus campanulatus मूळव्याध पंचांग बी

साबुकंद (टॅपिओका)

साबुकंद पाने (टॅपिओका)

१ ऊ. मसाले

वनस्पती लॅटिन नाव कोणत्या विकारांत उपयोगी ? औषधासाठी उपयुक्त अंग लागवडीसाठी उपयुक्त अंग
१. आले Zingiber officinale श्‍वसन आणि पचन संस्थांचे विकार कंद कंद
२. पुदिना Mentha spicata जुनाट ताप, खोकला, अपचन आणि जंत पंचांग बी
३. वेलची Elettaria cardamomum मूत्रवहनसंस्थेचे विकार, ताप आणि डोकेदुखी फळे कंद

१ ए. औषधी वनस्पती

वनस्पती लॅटिन नाव कोणत्या विकारांत उपयोगी ? औषधासाठी उपयुक्त अंग लागवडीसाठी उपयुक्त अंग
१. आंबेहळद Curcuma amada श्‍वसनसंस्थेचे विकार, ताप आणि सूज कंद कंद
२. आस्कंद (अश्‍वगंधा) Withania somnifera केस, डोळे, श्‍वसनसंस्था आणि शुक्राणू यांच्याशी संबंधित विकार मूळ बी
३. इसबगोल Plantago ovata बद्धकोष्ठता बी बी
४. उन्हाळी Tephrosia purpurea कावीळ, पानथरी वाढणे, यकृताचे विकार आणि मूळव्याध पंचांग बी किंवा खोडाचे छाट
५. कचोरा Curcuma zedoaria पचन आणि मूत्रवहन या संस्थांचे विकार कंद कंद

वरील प्रमाणे २०० हून अधिक वनस्पतींचे गुणधर्म आणि लागवडीची पद्धत
जाणून घेण्यासाठी वाचा सनातन प्रकाशित ग्रंथ औषधी वनस्पतींची लागवड करा !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘औषधी वनस्पतींची लागवड करा !’

2 thoughts on “परसात किंवा बागायतीमध्ये लावता येण्याजोग्या औषधी वनस्पती”

    • Namaste Dr Tiwari ji

      Thank you for your comments. Currently we advise people to approach their nearest forestry department to obtain the medicinal plants, as almost all cities have such government-run nurseries. However, we will keep your suggestion in mind.

      Warm regards,
      Sanatan Sanstha

      Reply

Leave a Comment