गुरुदेवांवर अपार श्रद्धा असणार्‍या वारणानगर येथील डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे (वय ७८ वर्षे) संतपदी विराजमान !

 

सनातनच्या इतिहासात एकाच वेळी आई संत,
तर मुलगी जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होण्याची अभूतपूर्व घटना !

कन्या डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे (वय ५२ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांची एक भावमुद्रा

नवे-पारगाव (वारणानगर, जि. कोल्हापूर) – एकाच वर्षी पती आणि जावई यांचे निधन, अशा अत्यंत कठीण प्रसंगांना साधनेच्या बळावर तोंड देणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणार्‍या आणि अत्यंत विनम्र अशा डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे (वय ७८ वर्षे) या सनातन संस्थेच्या १०९ व्या समष्टी संतपदी विराजमान झाल्या. तसेच त्यांच्या कन्या डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे (वय ५२ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी एका भावस्पर्शी ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात ही घोषणा केली.

डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे

या मंगलप्रसंगी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला, तसेच आधुनिक वैद्या शिल्पा कोठावळे यांचा सत्कार केला. रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा यांच्या पूर्वसंध्येला परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कोल्हापूर जिल्ह्याला दिलेल्या भावस्पर्शी भेटीचा हा आनंद अवर्णनीय होता. सनातनच्या इतिहासात एकाच दिवशी आई संत आणि मुलगी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित होण्याची ही अभूतपूर्व घटना पहायला मिळाल्याविषयी साधकांनी कृतज्ञता व्यक्त केली.

या वेळी डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे यांचे पुत्र डॉ. कौशल कोठावळे हेही उपस्थित होते. ‘ऑनलाईन’ उपस्थित असलेल्या काही साधकांनी या मंगलप्रसंगी मनोगत व्यक्त केले. पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे या प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ आहेत, तर डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे या ‘एम्.डी.’ मेडिसिन आहेत.

क्षणचित्र

नवे-पारगाव येथे सकाळपासून पाऊस नव्हता; मात्र ‘ऑनलाईन’ कार्यक्रमास प्रारंभ झाल्यावर दुपारी ४ वाजता पाऊस आला. यामुळे ‘वरुणदेवतेनेही या आनंदात सहभागी होऊन आशीर्वाद दिले’, असे साधकांना जाणवले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment