विद्यार्थी-साधकांनो, उन्हाळ्याच्या सुट्टीत चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवा आणि साधनेचे बीज अंतरात रोवून हिंदु राष्ट्रासाठी पात्र व्हा !

सर्वत्रच्या विद्यार्थी-साधकांना सनातनच्या आश्रमांत रहाण्याची अमूल्य संधी !

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे श्रीरामनवमीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन

मी मृत्यूला घाबरत नाही. माझे एकच लक्ष्य आहे आणि ते म्हणजे ‘हिंदु राष्ट्र’, असे प्रतिपादन येथील गोशामहल विधानसभा क्षेत्राचे भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांनी श्रीरामनवमीच्या दिवशी काढले.

१३.४.२०२२ या दिवशी गुरु (बृहस्पति) ग्रहाचा मीन राशीतील प्रवेश आणि या कालावधीत होणारे परिणाम !

१३.४.२०२२ या दिवशी दुपारी ३.४५ वाजता गुरु हा ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. गुरु ग्रह एका राशीत साधारण १३ मास रहातो. या १३ मासांच्या मध्यावर असलेल्या २ मासांमध्ये गुरु ग्रहाचे अधिक परिणामकारक फळ मिळते.

रामजन्मभूमी खटल्यातील मुख्य अधिवक्ता के. परासरन् यांचा सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आला सन्मान !

अधिवक्ता परासरन् यांना सनातनचे संत पू. प्रभाकरन् यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि तमिळ भाषेतील सनातननिर्मित ग्रंथ भेट देण्यात आले. या वेळी सनातनच्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांच्या हस्ते के. परासरन् यांना सनातननिर्मित भगवान श्रीरामाचे चित्र भेट दिले.

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी ठिकठिकाणी हिंदुत्वनिष्ठांचे साकडे !

मुंबई येथे बोरिवली (दत्तपाडा), दहिसर (अशोकवन), अंधेरी (म्हातारपाडा), जोगेश्वरी (बांद्रेकरवाडी), वरळी (कोळीवाडा), चेंबूर, नवी मुंबईमध्ये कोपरखैरणे, तर पालघर जिल्ह्यात नालासोपारा (आचोले), बोईसर (चिंचणी), भेंडीबाजार आणि खारघर आदी ठिकाणी मंदिरांमध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देवतांना साकडे घालण्यात आले.

अक्षय्य तृतीयेला ‘सत्पात्रे दान’ करून ‘अक्षय्य दाना’चे फळ मिळवा !

‘अक्षय्य तृतीया’ म्हणजे साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही, म्हणजे त्यांचे फळ मिळतेच. त्यामुळे या दिवशी मोठ्या प्रमाणावर दानधर्म करतात.

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने ग्राहकांना भेट म्हणून सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ देण्यासाठी सराफी दुकानदारांना उद्युक्त करा !

सनातनची अनमोल ग्रंथसंपदा अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्याच्या दृष्टीने साधकांनी सर्वत्रच्या सराफी दुकानदारांना संपर्क करावा.

सर्वसामान्य हिंदूंना हिंदु राष्ट्राची आवश्यकता पटवून देणे महत्त्वाचे !– अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने इंदूर येथे ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले. या अधिवेशनाला अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी विविध मान्यवरांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा निर्धार केला.

हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करण्यासाठी भगवंताचे भक्त होणे आवश्यक ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

गदग (कर्नाटक) येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-संघटक कार्यशाळा पार पडली !

सनातनच्या इंग्रजी ‘ई-बूक’चे वाराणसी येथे लोकार्पण !

चैत्र नवरात्रीच्या पवित्र काळात वाराणसी येथील ‘अखिल भारतीय धर्मसंघ शिक्षा मंडल’चे महामंत्री श्री. जगजीतन पांडे यांच्या शुभहस्ते ‘इम्पॉर्टन्स ऑफ पर्सनॅलिटी डिफेक्ट रिमूव्हल अँड इन्कलकेटिंग व्हर्च्यूज्’ या सनातनच्या इंग्रजी भाषेतील ग्रंथाचे लोकार्पण करण्यात आले.