श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना ‘ॐ शिव शक्ति ॐ’ पुरस्कार देऊन सन्मानित करणार !

केरळमधील ‘शिवोहम् टेंपल ऑफ कॉन्शियसनेस’च्या वतीने देण्यात आला पुरस्कार !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना पुरस्कार प्रदान करतांना ब्रह्मश्री डॉ. सोमनाथ राघवन् आचार्य

कण्णूर (केरळ) : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी तथा हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी महर्षींच्या आज्ञेने देश-विदेशांत लाखो किलोमीटर भ्रमंती करणार्‍या, तहान-भूक, उन-पाऊस यांची तमा न बाळगता धर्मप्रसार करणार्‍या आणि सूक्ष्मातील जाणण्याची अफाट क्षमता असलेल्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना ‘ॐ  शिव शक्ति ॐ’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

‘ॐ शिव शक्ति ॐ’ पुरस्काराचे सन्मान चिन्ह

केरळमधील ‘शिवोहम् टेंपल ऑफ कॉन्शियसनेस ट्रस्ट’च्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी हे ‘सनातन एलम वास्तूरत्न’चे कुलपती असलेले ब्रह्मश्री डॉ. सोमनाथ राघवन् आचार्य होते, तर सन्माननीय अतिथी म्हणून ‘कृष्णा बिच रिसॉर्ट’च्या ‘शिवोहम् स्पिरिच्युअल वेलनेस सेंटर’च्या मुख्य चिकित्सक डॉ. ज्योती शमिथ यांना निमंत्रित करण्यात आले होते.

ब्रह्मश्री डॉ. सोमनाथ राघवन् आचार्य यांनी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना हा पुरस्कार प्रदान केला. डॉ. ज्योती शमिथ यांनी प्रमाणपत्र देऊन, तर सौ. सुधा रविंद्रनाथ यांनी पोनाडा (दक्षिण भारतात देण्यात येणारी एकप्रकारची शाल) प्रदान करून श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा सन्मान केला. या वेळी तमिळनाडू येथील गुडालूर येथील चिंतामणी वाघेश्वरी मुकंबिका मंदिराच्या मठाधिपती प.पू. डॉ. ब्रह्म योगिनी श्री श्री श्री माता अंबिका चैतन्यमयी यांनाही ‘ॐ  शिव शक्ति ॐ’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार ‘शिवोहम् स्पिरिच्युअल वेलनेस सेंटर’चे संस्थापक डॉ. सी.व्ही. रविंद्रनाथ यांनी जाहीर केला होता.

स्वतःतील आंतरिक शक्ती, दृढ निश्चय आणि कृपाशीर्वाद यांद्वारे नेतृत्व करून दिशादर्शन करणार्‍या महिलांना हा पुरस्कार देण्यात येतो.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

केरळमधील ‘शिवोहम् टेंपल ऑफ कॉन्शियसनेस ट्रस्ट’च्या वतीने देण्यात येणारा ‘ॐ शिव शक्ति ॐ पुरस्कार’ यावर्षी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना घोषित करण्यात आला आहे. स्वतःतील आंतरिक शक्ती, दृढ निश्चय आणि कृपाशीर्वाद यांद्वारे नेतृत्व करून दिशादर्शन करणार्‍या महिलांना हा पुरस्कार देण्यात येतो. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासह तमिळनाडू येथील गुडालूर येथील चिंतामणी वाघेश्वरी मुकंबिका मंदिराच्या मठाधीपती प.पू. डॉ. ब्रह्म योगिनी श्री श्री श्री माता अंबिका चैतन्यमयी यांनाही हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

‘शिवोहम् टेंपल ऑफ कॉन्शियसनेस ट्रस्ट’च्या वतीने देण्यात येणारा ‘ॐ शिव शक्ति ॐ पुरस्कार’

आद्यशंकराचार्य जयंतीच्या दिवशी, म्हणजेच २ मे या दिवशी हा पुरस्कार देण्यात येणार  आहे. याआधी ‘शक्तिवेद वेलनेस मिशन’च्या प.पू. माताजी डॉ. श्रीप्रिया आणि ‘श्री संतानंद मठ ऋषि ज्ञान साधनालयम्’च्या प.पू. स्वामिनी देवी ज्ञानभा निष्ठानंद गिरि यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. ‘ॐ शिव शक्ति ॐ पुरस्कार’ या पुरस्कारासह या वेळी ‘माईलपिली पुरस्कार’ पुरस्कारही प्रदान करण्यात येणार आहेत. हा पुरस्कार आरोग्य, तसेच अन्य क्षेत्रांत भरीव कामगिरी करणार्‍यांना दिला जातो. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी हे सनातन एलम वास्तूरत्नचे कुलपती तथा मुख्य तंत्री (पुजारी) असलेले ब्रह्म श्री डॉ. सोमनाथ राघवन् आचार्य असणार आहेत, तर सन्माननीय अतिथी या ‘कृष्णा बिच रिसॉर्ट’च्या ‘शिवोहम स्पिरिच्युअल वेलनेस सेंटर’च्या मुख्य चिकित्सक डॉ. ज्योती शमिथ असणार आहेत.

‘शिवोहम् टेंपल ऑफ कॉन्शियसनेस ट्रस्ट’विषयी थोडेसे …

‘शिवोहम् टेंपल ऑफ कॉन्शियसनेस ट्रस्ट’च्या वतीने अध्यात्म आणि संस्कृती यांविषयी जागृती करण्यासाठी समाजात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. या ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षी ‘ॐ शिव शक्ति ॐ पुरस्कार ’, ‘माईलपिली पुरस्कार’ आदी पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या ट्रस्टच्या वतीने केरळमधील ‘कृष्णा बिच रिसॉर्ट’ येथे केंद्र चालवण्यात येते. या केंद्रात ‘योग, ध्यान आदींद्वारे तणाविरहित जीवन कसे जगायचे ?’, आदींविषयी समुपदेशन केले जाते. ही संस्था संयुक्त राष्ट्रांच्या ‘यू.एन्. ग्लोबल कॉम्पॅक्ट’शी संलग्न आहे. हा संयुक्त राष्ट्रांचा धोरणात्मक उपक्रम आहे. या उपक्रमाद्वारे मानवी हक्क, पर्यावरण आदी क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या जागतिक आस्थापनांना सहकार्य आणि पाठिंबा दिला जातो.

Leave a Comment