‘जागतिक महिला दिना’चे औचित्य

चंद्रपूर – ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने ‘गायत्री परिवारा’च्या वतीने उल्लेखनीय धर्मकार्य केल्याविषयी येथील सनातनच्या साधिका सौ. मंगला दरवे आणि सौ. दीपाली सिंगाभट्टी यांचा सत्कार करण्यात आला. महिला दिनी श्री वेदमाता गायत्री शक्तिपीठ या ठिकाणी झालेल्या या सत्काराला डॉ. प्रज्वला असवार, डॉ. वंदना रेगुंडवार, न्यू इंग्लिश हायस्कूलच्या प्राचार्या सौ. संगीता प्रशांत वैद्य आणि गायत्री परिवाराच्या डॉ. अपर्णा शुक्ला यांच्यासह परिवाराचे साधक उपस्थित होते. या कार्यक्रमात सनातनच्या साधिकांसह समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणार्या महिलांचाही सत्कार करण्यात आला. यानिमित्त सर्वांना सन्मानपत्र भेट देण्यात आले.
सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
वाराणसीतील श्री काशीविश्वनाथ मंदिराच्या पुजार्यांकडून सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा सन्मान !
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा पाटलीपुत्र (बिहार) येथे ‘आंतरराष्ट्रीय ज्योतिष, वास्तू...
सच्चिदानंद परब्रह्म डॉ आठवले यांचा पुणे येथे ‘श्रीगुरु गौरव दीक्षा शताब्दी महोत्सव २०२० ते २०२६’...
‘आय.एम्.ए.’च्या फोंडा शाखेच्या वतीने सनातन संस्थेचे साधक आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांचा सत्कार !
सनातन संस्थेच्या सौ. कांचन पवळे यांना ‘वीर सावरकर हिंदु गौरव’ पुरस्कार प्रदान !