फ्रान्सच्या सीनेटमध्ये ‘भारत गौरव पुरस्कार’ देऊन सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा सन्मान !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना ५ जून २०२४ या दिवशी फ्रान्सच्या सीनेटमध्ये (संसदेमध्ये) ‘भारत गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

‘वेदशास्त्र रिसर्च ॲण्ड फाऊंडेशन’च्या वतीने सनातन संस्थेचा ‘हिंदुत्व के आधारस्तंभ’ पुरस्कार देऊन सन्मान !

‘वेदशास्त्र रिसर्च ॲण्ड फाऊंडेशन’च्या वतीने देशभरातील सांस्कृतिक, सामाजिक आणि हिंदुत्वाच्या क्षेत्रात समर्पित भावाने उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवर व्यक्ती आणि संस्था यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे माजी राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सनातन संस्थेला ‘हिंदुत्व के आधारस्तंभ’ (पिलर्स ऑफ हिंदुत्व) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कोपरखैरणे येथील सनातनच्‍या साधिका सौ. तनुजा यादव यांचा महिला दिन निमित्त गौरव !

या वेळी सौ. तनुजा यादव यांसह विविध क्षेत्रांतील कर्तृत्‍ववान महिलांचा सन्‍मानचिन्‍ह देऊन सन्‍मान करण्‍यात आला. नवी मुंबई महानगरपालिकेच्‍या अतिरिक्‍त आयुक्‍त श्रीमती सुजाता ढोले यांच्‍या हस्‍ते या कार्यक्रमाचे उद़्‍घाटन झाले.

सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांचा ‘हिंदुत्वाचे आधारस्तंभ’ पुरस्काराने सन्मान !

यशवंतराव चव्हाण सभागृहात ‘हिंदु एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन’द्वारे आयोजित ‘पिलर्स ऑफ हिंदुत्व’ या संमेलनामध्ये विविध क्षेत्रांत हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या प्रतिनिधींचा ‘हिंदुत्वाचे आधारस्तंभ’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

सनातन आश्रम पनवेल येथील साधक डॉ. दीपक जोशी ʻकोरोना योद्धाʼ पुरस्काराने सन्मानित

सनातनचे पनवेल येथील साधक डॉ. दीपक जोशी यांनी लॉकडाऊनच्या काळात अनेक रुग्णांना समुपदेशन करणे त्यांना धीर देणे, साधना सांगून स्थिर जीवन जगण्याची दिशा देणे आदी विशेष प्रयत्न केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा विविध संतांनी सन्मानांद्वारे केलेला गौरव !

संतांचे कार्य आध्यात्मिक (पारलौकिक) स्तरावरचे असल्याने त्यांना लौकिक सन्मान अन् पुरस्कार यांचे अप्रूप वाटत नाही.

सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांना हिंदुत्व शौर्य पुरस्कार प्रदान

येथील क्रांतीवीर वसंतदादा बडवे न्यासाच्या वतीने सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांना १९ ऑक्टोबर या दिवशी ह.भ.प. शंकर महाराज बडवे यांच्या हस्ते हिंदुत्व शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.