
फोंडा – ‘इंडियन मेडिकल असोसिएशन (आय.एम्.ए.) फोंडा शाखा’ यांच्या वतीने ‘डॉक्टर्स डे’निमित्त ३ आधुनिक वैद्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सनातनचे साधक डॉ. पांडुरंग मराठे, तसेच डॉ. गजानन नाईक आणि डॉ. सूरज काणेकर यांचा समावेश होता. ‘आय.एम्.ए. गोवा’चे अध्यक्ष डॉ. दत्ताराम देसाई यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला.

‘डॉक्टर्स डे’निमित्त ‘दिलासा पेलिएटिव्ह’ केंद्रात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला ‘आय.एम्.ए.’च्या फोंडा शाखेचे अध्यक्ष डॉ. अजय पेडणेकर, आय.एम्.ए. फोंडा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संतोष उसगावकर, उपाध्यक्ष डॉ. सुभाष शिकेरकर, तसेच अन्य पदाधिकारी आणि अनेक आधुनिक वैद्य (डॉक्टर) यांची उपस्थिती होती.

Doctors’ Day Honours | Ponda, Goa
IMA Ponda Branch felicitated Dr. Pandurang Marathe (@SanatanSanstha), Dr. Gajanan Naik & Dr. Suraj Kanekar for decades of selfless service.
Dr. Marathe was honoured for 40+ yrs in medicine, incl. 20 yrs of free treatment to thousands via… pic.twitter.com/sJb6xVQASJ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 5, 2025
वैद्यकीय क्षेत्रात गेली ४० वर्षे निस्वार्थी, निरपेक्ष, तसेच समर्पित भावाने सेवा केल्याबद्दल डॉ. पांडुरंग मराठे यांचा शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. पांडुरंग मराठे यांनी त्यांच्या वैद्यकीय कारकीर्दीत पहिली ११ वर्षे सरकारी रुग्णालयांत सेवा दिली. त्यानंतर ते सनातन संस्था या अध्यात्मप्रसार करणार्या संस्थेच्या संपर्कात आल्यावर गेल्या २० वर्षांत त्यांनी संस्थेच्या वतीने सहस्रो गरीब रुग्णांना विनामूल्य वैद्यकीय सेवा पुरवली. त्या आधी त्यांनी ग्रामीण भागात रुग्णसेवा केली होती. या सर्व सेवांची नोंद घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे डॉ. सूरज काणेकर हेही योगगुरु रामदेवबाबा यांच्या पतंजलि योग समितीचे काही काळ गोवा प्रमुख होते. ते अजूनही समाजाला योगासनांचे महत्त्व सांगण्यासाठी वर्ग घेतात.
विविध परीक्षांत उत्तम यश प्राप्त केलेले विद्यार्थी आणि पॅरिस येथे ‘पॅरा ऑलिंपिक’मध्ये (गतीमंद मुलांच्या क्रीडास्पर्धेमध्ये) भारताचे प्रतिनिधित्व करणारी फोंडा येथील दृष्टीदोष असलेली कु. साक्षी ईश्वर काळे हिचाही या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
![]() |
|
|
डॉ. पांडुरंग मराठे यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता !

आधुनिक वैद्य बनण्यात ज्या ज्या लोकांनी, शिक्षकांनी, तसेच वैद्यांनी साहाय्य केले आणि जे अजूनही साहाय्य करत आहेत त्यांच्याप्रती डॉ. पांडुरंग मराठे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. केवळ आधुनिक वैद्य नव्हे, तर चांगला आधुनिक वैद्य होण्यासाठी, तसेच आनंदी जीवन जगण्यासाठी ज्यांचे मार्गदर्शन मिळत आहे, त्याबद्दल त्यांनी त्यांचे गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.


सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
वाराणसीतील श्री काशीविश्वनाथ मंदिराच्या पुजार्यांकडून सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा सन्मान !
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा पाटलीपुत्र (बिहार) येथे ‘आंतरराष्ट्रीय ज्योतिष, वास्तू...
चंद्रपूर येथे गायत्री परिवाराकडून सनातन संस्थेच्या साधिकांचा सत्कार
सच्चिदानंद परब्रह्म डॉ आठवले यांचा पुणे येथे ‘श्रीगुरु गौरव दीक्षा शताब्दी महोत्सव २०२० ते २०२६’...
सनातन संस्थेच्या सौ. कांचन पवळे यांना ‘वीर सावरकर हिंदु गौरव’ पुरस्कार प्रदान !