दत्त जयंती निमित्त बांगर येथील श्री दत्त पादुका मंदिरात सनातन संस्थेने लावलेल्या ग्रंथ-उत्पादन प्रदर्शनाचा सहस्रो जिज्ञासूंनी घेतला लाभ !
दत्त जयंती निमित्त बांगर येथील श्री दत्त पादुका मंदिरात जन्मोत्सव साजरा केला गेला. या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ‘देवालय दर्शन’, ‘साधना’, ‘धर्माचरण’, यांविषयी मार्गदर्शन करणार्या फ्लेक्स फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले. तसेच सनातनच्या विविध विषयांवरील अनमोल ग्रंथ आणि सात्त्विक पूजासाहित्य यांचा वितरण कक्षही उभारण्यात आला.