मुंबई – सनातन संस्थेच्या वतीने देशभरातील विविध शिवमंदिरांमध्ये ६५० हून अधिक ठिकाणी ग्रंथ आणि सात्त्विक साहित्यांचे वितरण कक्ष, तसेच शिवाची अध्यात्मशास्त्रीय माहिती सांगणारे फलक लावून धर्मप्रसार करण्यात आला. या सर्वच वितरण कक्षांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वितरण कक्षांवर भाविकांनी सनातन संस्थेने प्रकाशित केलेले विविध ग्रंथ-लघुग्रंथ, सात्त्विक साहित्य खरेदी करण्यासमवेत शंकानिरसनही करून घेतले. अनेक ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांनी या वितरणकक्षांना भेट दिली.