नागपूर येथे धर्मरथावरील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

श्री. अजय कुमार सिंह (डावीकडे) यांना ग्रंथांविषयी माहिती सांगतांना सनातनचे साधक

नागपूर – येथे विविध ठिकाणी सनातनच्या धर्मरथाच्या (सात्त्विक उत्पादने आणि सनातनचे ग्रंथ यांचे फिरते वितरणकेंद्र) माध्यमातून राष्ट्ररक्षण, धर्मजागृतीविषयक, तसेच अध्यात्मशास्त्र सुलभ भाषेत सांगणारे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले.

४ फेब्रुवारीला रुद्रशक्ति एनक्लेव्ह, मनिषनगर येथे श्री. अजय कुमार सिंह यांच्या हस्ते धर्मरथाचे पूजन करण्यात आले. श्री. अजय कुमार सिंह हे आनंद ही आनंद या आध्यात्मिक संस्थेशी संलग्न असून ते ग्लोबल अ‍ॅडव्हाईझरी काउन्सिलचे अध्यक्ष आहेत. प्रत्येक धार्मिक, सामाजिक उपक्रमामध्ये राष्ट्रीय धोरण असायला हवे, यासाठी ते प्रयत्नरत आहेत. हिंदु जनजागृती समिती, तसेच अन्य संप्रदाय यांना एकत्रित करण्याच्या कार्यात ते तत्पर आहेत. ५ फेब्रुवारीला प्रतापनगर चौक, तर ७ फेब्रुवारीला गजानन महाराज मंदिर, सक्करदरा येथे हे प्रदर्शन लावण्यात आले. स्थानिकांचा या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment