रामनाथी येथील सनातन आश्रमात चार दिवसीय प्रांतीय युवा साधक प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ !

नियमित साधना कशी करावी? याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने रामनाथी येथील सनातन आश्रमात १६ ते १९ नोव्हेंबर या काळात प्रांतीय युवा साधक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

त्रिचूर (केरळ) येथे सनातनच्या वतीने जिज्ञासूंना साधना आणि स्वभावदोष अन् अहं निर्मूलन यांविषयी मार्गदर्शन

सनातन संस्थेच्या कु. रश्मी परमेश्वरन् आणि श्री. नंदकुमार कैमल यांनी ‘साधना, आध्यात्मिक उपाय, अध्यात्माचे महत्त्व, स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाचे महत्त्व’ यांविषयी मार्गदर्शन केले.

नगर येथे सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांच्या प्रदर्शनाच्या धर्मरथाचे पूजन

येथील गांधी मैदान येथे १ ऑक्टोबर या दिवशी सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांच्या प्रदर्शनाचा फिरता धर्मरथ लावण्यात आला होता.

बेंगळूरू येथील ‘प्रथम कन्नड साहित्य संमेलना’मध्ये सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शन

बेंगळूरू येथील राजराजेश्वरी नगरामध्ये ३० सप्टेंबर या दिवशी ‘प्रथम कन्नड साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. या ठिकाणी सनातन संस्थेकडून ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.

मुंबईत ठिकठिकाणी गणेशोत्सवात प्रवचने, फ्लेक्स, ग्रंथ प्रदर्शन आदींच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार !

गणेशोत्सवाच्या काळात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने अनेक ठिकाणी हस्तपत्रके, भित्तीपत्रके, फ्लेक्स, प्रवचने, ग्रंथ प्रदर्शन अशा विविध माध्यमातून अध्यात्मप्रसार करण्यात आला. याविषयीचा वृत्तांत येथे देत आहोत.

देहली आणि हरियाणा येथील श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या कार्यक्रमात सनातन संस्थेचा सहभाग !

श्रीकृष्णप्रमाणे आदर्श होण्यासाठी प्रतिदिन आई-वडिलांना नमस्कार केला पाहिजे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या साधिका कु. मनीषा माहुर यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त करोल बाग येथील उदासीन आश्रमात बालसंस्कार समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले.

कर्नाटक येथे आयोजित धर्मसंसदेत सनातनच्या कन्नड भाषेतील ‘गणेश पूजा आणि आरती’ या अ‍ॅपचे प्रकाशन

राजकारण्यांनी राष्ट्राच्या आध्यात्मिक आणि नैतिक उन्नतीसाठी संतांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. केवळ संतच राष्ट्रहितासाठी कोणती व्यवस्था, कायदे, धर्म आवश्यक आहेत, हे सांगू शकतात आणि तेच राष्ट्राचे भविष्य उज्ज्वल करू शकतात.

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या हस्ते ‘श्री गणेश पूजा आणि आरती’ या अँड्रॉईड अ‍ॅपचे उद्घाटन

 ‘श्री गणेश पूजा आणि आरती’ या ‘अँड्रॉईड अँप’चे उद्घाटन येथील सनातनच्या आश्रमामध्ये परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या हस्ते १२ ऑगस्टला झाले.

झारखंड, बंगाल आणि आसाम राज्यांत ६ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा !

सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटना यांनी संयुक्तरित्या झारखंड, बंगाल अन् आसाम राज्यांत ६ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित केला होता.

चेन्नई येथे गुरुपौर्णिमेनिमित्त सनातनच्या वतीने विशेष सत्संग

चेन्नई अण्णानगर, येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विशेष सत्संग घेण्यात आला. श्री. बालाजी यांनी त्यांच्या व्यावसायिक क्षेत्रातील मित्रांसाठी या सत्संगाचे त्यांच्या निवासस्थानी आयोजन केले होते.