कोची : ‘अमृता स्कूल ऑफ आर्टस् अँड सायन्स’ येथील पुस्तक मेळ्यात सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन

सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

माहिती सांगतांना डावीकडून श्री. नंदकुमार कैमल, स्वामी पूर्णामृतानंद पुरी आणि डॉ. यू. कृष्णकुमार

कोची (केरळ) – १४ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत येथील माता अमृतानंदयी यांनी स्थापन केलेल्या ‘अमृता स्कूल ऑफ आर्टस् अँड सायन्स’ येथे ‘समग्र – नॅशनल सेमिनार ऑन इंडियन लिटरेचर अँड कल्चर’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या निमित्ताने पुस्तक मेळ्याचे आयोजन केले होते. स्वामी पूर्णामृतानंद पुरी यांनी या पुस्तक मेळ्याचे उद्घाटन करण्यात आले. या मेळ्यात सनातन संस्थेनेही ग्रंथप्रदर्शन कक्ष लावले होते. स्वामी पूर्णामृतानंद पुरी यांनी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शन कक्षाला भेट दिली. देवतांचे लघुग्रंथ पाहून ते म्हणाले, ‘‘असे लघुग्रंथ पुष्कळ चांगले आहेत. कुणालाही ते वाचून समजून घेणे सोपे होईल.’’

 

शाळा आणि महाविद्यालये यांविषयी साधकांना लक्षात आलेली सूत्रे

१. शाळा आणि महाविद्यालय यांतील काही विद्यार्थी अध्यात्माविषयी जाणून घेण्याची रूची दाखवत होते. काही जण आध्यात्मिक संशोधनाविषयी किंवा देवतांविषयीचे शास्त्र सांगत असतांना ते जिज्ञासूपणे ऐकत होते.

२. अनेक विद्यार्थ्यांना सनातन संस्थेचे सात्त्विक उत्पादने आवडली. ते त्यांच्या वर्गात जाऊन इतर विद्यार्थ्यांना त्याविषयी सांगत होते.

३. महाविद्यालयातील अनेक कर्मचारी, अध्यापक हे काही वर्षांपासून सनातन संस्थेची उत्पादने घेत आहेत. त्याविषयी सर्वांचा अभिप्राय पुष्कळ चांगला आहे. तेथील महाविद्यालयाचे संचालक डॉ. यु. कृष्णकुमार हेही गेली काही वर्षे उत्पादने आणि ग्रंथ घेत आहेत. ते इतरांना याविषयी सांगतात. त्यांना सनातन संस्थेविषयी पुष्कळ आदर आहे.

४. कार्यक्रम चांगल्या प्रकारे आयोजित करण्यात आला होता. प्रदर्शन लावणार्‍या सर्व कक्षांच्या लोकांची त्यांनी प्रेमाने लक्ष देऊन काळजी घेतली.

५. या महाविद्यालयातील वातावरण पुष्कळ सात्त्विक आहे. अन्य महाविद्यालयांच्या तुलनेत येथील विद्यार्थी सर्वांशी पुष्कळ आदरयुक्त वागत होते. येथील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांची अन्य महाविद्यालयांच्या तुलनेत अध्यात्माकडे ओढ अधिक आहे. सर्व विद्यार्थी, कर्मचारी आणि प्राध्यापक यांच्यामध्ये प्रेमभाव जाणवला.

– कु. अदिती सुखठणकर, कु. रश्मी परमेश्‍वरन् आणि श्री. नंदकुमार कैमल, केरळ
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment