ब्रह्मपूर येथील शिव मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आले ग्रंथ आणि फ्लेक्स प्रदर्शन

सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त जळगाव जिल्ह्यात अध्यात्मप्रसार

फ्लेक्स प्रदर्शन पहातांना जिज्ञासू

जळगाव – सनातन संस्थेच्या वतीने शहरातील ओंकारेश्‍वर महादेव मंदिर, एस्.टी. वर्कशॉप येथील महादेव मंदिर, शिवधाम निमखेडी, भुसावळ येथील रानातील महादेव मंदिर, नर्मदेश्‍वर महादेव मंदिर, चोपडा येथील हरेश्‍वर मंदिर, जामनेर येथील सोनबर्डी महादेव मंदिर, पाचोरा आणि ब्रह्मपूर येथील महादेव मंदिर येथे ग्रंथ कक्षांच्या माध्यमांतून अलौकिक ज्ञान असलेले सनातन संस्थेचे ग्रंथ भाविक अन् जिज्ञासू यांच्यासाठी उपलब्ध होते. भगवान शिवाची वैशिष्ट्ये, शिवाची उपासना कशी करावी ?, शिवाला बेल कसा वहावा ?, रुद्राक्षाचे महत्त्व, शिवाच्या नावांचा आध्यात्मिक अर्थ आदी ज्ञान या कक्षांवर ग्रंथरूपात उपलब्ध होते. तसेच यांविषयी तात्त्विक माहिती देणारे फ्लेक्स प्रदर्शनही लावण्यात आले होते. याला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद लाभून अध्यात्मप्रसार झाला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात