सनातन संस्थेच्या वतीने चेन्नई येथे सत्संग सोहळा

पू. (सौ.) उमा रविचंद्रन यांच्याकडून उपस्थितांना मार्गदर्शन

सत्संग सोहळ्याला उपस्थित जिज्ञासू

चेन्नई (तमिळनाडू) – येथील अरूम्बक्कम भागातील पेरूमल स्कूल या ठिकाणी ९ फेब्रुवारी या दिवशी विशेष सत्संग सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये सौ. कल्पना बालाजी यांनी ‘साधना’ या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच सौ. सुगंधी जयकुमार यांनी ‘पॉवर पॉईंट’ प्रणालीद्वारे ‘पूर्वजांचे त्रास आणि त्यावरील उपाय’ याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर श्री. बालाजी कोल्ला यांनी या विषयावरील प्रात्यक्षिक दाखवले. या वेळी ‘शिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व’ याविषयी माहिती देण्यात आली.

या सत्संगामध्ये श्री. प्रभाकरन् यांनी धर्मकार्य करणारे श्री. चेंचुलु राजू आणि श्री. कानन यांचा सत्कार करण्यात केला. सर्वांत शेवटी पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी मार्गदर्शन आणि उपस्थित जिज्ञासूंचे शंकानिरसन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कल्पना बालाजी यांनी केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात