नवी देहलीतील ‘संस्कार कॉन्व्हेंट’ शाळेमध्ये सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला चांगला प्रतिसाद

उपस्थित शिक्षकांना माहिती देतांना श्री. नरेंद्र सुर्वे

नवी देहली – नांगलोई येथील ‘संस्कार कॉन्व्हेंट’ शाळेमध्ये सनातन संस्थेकडून ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या वेळी पालक आणि शिक्षक यांची बैठकही आयोजित करण्यात आली होती. शाळेचे अध्यक्ष श्री. महेश सैनी यांनी यासाठी संस्थेला आमंत्रित केले होते. प्रदर्शन स्थळावर संस्थेचे साधक श्री. नरेंद्र सुर्वे यांनी उपस्थितांना माहिती दिली. या वेळी पालकांनी मुलांमध्ये संस्कार करण्याविषयी ग्रंथांची मागणी केली. प्रदर्शनानंतर संस्थेला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. श्री. सैनी यांनी सनातन संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली आणि या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment