पनवेल – रायगड जिल्ह्यामध्ये महाशिवरात्रीनिमित्त ७१ ठिकाणी सनातन संस्थेची ग्रंथप्रदर्शने लावण्यात आली होती. त्याला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आध्यात्मिक आणि आपत्कालीन विषयावरील ग्रंथ घेण्यास जिज्ञासूंनी रस दाखवला. अलिबाग येथे काशी विश्वेश्वर मंदिरातील ग्रंथप्रदर्शनाला मंदिराचे विश्वस्त श्री. आनंद गुरव; गुळसुंदे, रसायनी येथील शिवमंदिरात श्री संप्रदायाचे बाळकृष्ण देशमुख यांनी; करंजाडे येथील शिवमंदिरातील ग्रंथप्रदर्शनाला विचुंबे गावाचे सरपंच वासुदेव भिंगारकर आणि करंजाडे गावाचे उपसरपंच श्री. शेखर शेडगे; खांदेश्वर येथील शिवमंदिरात भाजपचे नगरसेवक गणेश पाटील; पेण येथील पाटणेश्वर शिवमंदिरात नगरपरिषदेच्या माजी सभापती सौ. दर्शना म्हात्रे यांनी; सेक्टर ५, नवीन पनवेल येथील शिवमंदिरात शिवसेना महिला मंडळाच्या अध्यक्षा आणि त्यांच्या सदस्या; तसेच कळंबोली येथील शिवमंदिरातील ग्रंथप्रदर्शनाला रायगड जिल्हा महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. मलबारी यांनी भेट दिली.




सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !