चेन्नई येथील देवी करूमारी अम्मन मंदिरात शिवरात्री पूजेच्या कार्यक्रमात सनातन संस्थेकडून प्रवचन

प्रवचन करतांना सौ. कल्पना बालाजी

चेन्नई (तमिळनाडू) – येथील नंगमबक्कम भागातील श्री देवी करूमारी अम्मन मंदिरात २१ फेब्रुवारी २०२० या दिवशी धर्मरक्षण समितीच्या डॉ. विजयालक्ष्मी यांनी शिवरात्री पूजा केली. पूजा करण्यापूर्वी सनातन संस्थेच्या साधकांना प्रवचन घेण्यासाठी ३० मिनिटे देण्यात आली होती. या वेळी सनातन संस्थेच्या साधिका सौ. कल्पना बालाजी यांनी तमिळ नववर्ष, वाढदिवस कसा साजरा करावा ?, शिवरात्रीचे महत्त्व, कुलदेवतेचा आणि दत्ताचा नामजप करण्याविषयीचे महत्त्व, या विषयांवर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी ७० जिज्ञासू उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment