चेन्नई येथील पुस्तक मेळाव्यात सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ग्रंथप्रदर्शनावर ग्रंथ वितरणाची सेवा करतांना (१) ७५ वर्षे वयाचे साधक श्री. प्रभाकरन्

चेन्नई – येथील वाय.एम्.सी.ए. येथे ९ जानेवारी ते २१ जानेवारी २०२० या कालावधीत आयोजित केलेल्या ४३ व्या पुस्तक मेळाव्यात ग्रंथप्रदर्शनामध्ये सनातन संस्थेने सहभाग घेतला. या ग्रंथप्रदर्शनातील ‘कंदालगम’ कक्षावर तमिळ भाषेतील सनातन संस्थेचे ग्रंथ आणि लघुग्रंथ ठेवण्यात आले होते. जवळजवळ १० सहस्र वाचकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. सनातन संस्थेच्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांच्यासह सनातन संस्थेच्या साधकांनी या प्रदर्शनकक्षावर सेवा केली.

ग्रंथप्रदर्शनाला भेट देणारे ‘आर्.बी.व्ही.एस्.’चे श्री. मनियनजी यांना सनातन संस्थेचे ग्रंथ भेट देतांना पू. (सौ.) उमा रविचंद्रन्
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment