पाळधी (जिल्हा जळगाव) येथे ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर व्याख्यान !

पाळधी येथे श्री. चेतन राजहंस यांच्या मार्गदर्शनाला उपस्थित धर्मप्रेमी

जळगाव – सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस हे जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले आहेत. समाजाला आनंदी जीवनाचा मार्ग दाखवणार्‍या सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेने समाजाला आनंददायी बनवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी पाळधी येथील धर्मप्रेमीना ‘स्वामी समर्थ केंद्रा’त ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर श्री. राजहंस यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा पुष्कळ धर्मप्रेमींनी लाभ घेतला.

Leave a Comment