फलक आणि डिजिटल स्क्रीन यांद्वारे मुंबईत श्री राजमातंगी महायज्ञ सोहळ्याचा प्रभावी प्रचार !

बसथांब्यावरील फ्लेक्स फलक

मुंबई, ११ मे (वार्ता.) – सनातन संस्थेच्या वतीने १७ मे या दिवशी प्रभादेवी येथील नर्दुल्ला टँक मैदानावर दुपारी ३.३० ते ७.३० या वेळेत श्री राजमातंगी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक भाविकांना या यज्ञाचा लाभ व्हावा, यासाठी मुंबई आणि उपनगर यांमध्ये फलक अन् डिजिटल स्क्रीन यांद्वारे अत्यंत प्रभावी प्रचार होत आहे.

रस्त्याच्या दर्शनी भागातील होर्डिंग

यज्ञातील विज्ञापनांमधील ‘श्री राजमातंगीदेवीचे सात्त्विक आणि चैतन्यदायी रूप सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. फलक, डिजिटल स्क्रीन यांद्वारे आतापर्यंत सहस्रावधी भाविकांपर्यंत यज्ञाची माहिती पोचली आहे.

लोकलमधील एल्.ई.डी. स्क्रीन

पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या डब्यांतील ‘एल्.ई.डी.’ टीव्हीवर यज्ञाची विज्ञापने प्रदर्शित करण्यात आली आहेत. त्यामुळे रेल्वेतून नियमित प्रवास करणार्‍या प्रवाशांपर्यंत यज्ञाची माहिती पोचत आहे. मुंबईतील विविध ठिकाणचे बसथांबे यांसह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, भांडुप आणि माटुंगा आदी रेल्वेस्थानकांच्या फलाटांवर फलकाद्वारे अन् रेल्वेस्थानकांच्या बाहेर ‘एल्.ई.डी.स्क्रीन’वरूनही यज्ञाची विज्ञापने नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. पवई येथील महामार्गावर यज्ञाच्या विज्ञापनाचे ६० फूट लांबीचे होर्डिंग लावण्यात आले आहे. ते पुष्कळ लक्षवेधी ठरत आहे.

मार्गावरील डिजिटल स्क्रीन होर्डिंग

यज्ञ सोहळ्यात सहभागी होण्यासाठी फलकांवर ‘क्यू.आर्.’ कोड प्रदर्शित करण्यात आला आहे. याद्वारे अनेक राष्ट्र आणि धर्मप्रेमी नागरिक यज्ञ सोहळ्याला येण्यासाठी नोंदणी करत आहेत. यासह फलकांवर प्रसारित क्रमांकावर संपर्क करून अनेक जिज्ञासू यज्ञ सोहळ्याची माहिती जाणून घेऊन यज्ञाला येण्यासाठी सहभाग नोंदवत आहेत.

Leave a Comment