१७ मे या दिवशी असलेल्या श्री राजमातंगी महायज्ञानिमित्त…
मुंबई, १० मे (वार्ता.) – सध्याच्या युद्धकाळात तपोभूमी भारताला संरक्षककवच लाभावे आणि भारताची सर्वांगीण अभिवृद्धी व्हावी, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ १७ मे या दिवशी आयोजित केला आहे.

श्री गणेशाच्या कृपाशीर्वादाने हा यज्ञसोहळा निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या शुभहस्ते ७ मे या दिवशी यज्ञाच्या नियोजित पटांगणावर विघ्नहर्ता श्री महागणपति आणि भूमाता यांचे पूजन करण्यात आले. या वेळी सनातन संस्थेच्या पू. (सौ.) संगीता जाधव यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली. या प्रसंगी सनातनचे साधकही उपस्थित होते.
🕉️ Shri Mahaganapati and Bhumi Pujan performed by Sadguru Anuradha Wadekar, ‘Dharmapracharak’ of @SanatanSanstha, for the upcoming ‘Shri Rajamatangi Mahayagya’.
The Mahayagya will be conducted in Mumbai on May 17 for Bharat’s protection, spiritual strength, and all-round… pic.twitter.com/ztBCoRCuqU
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 11, 2026
सनातनचे साधक पुरोहित श्री. श्रेयस पिसोळकर यांनी या पूजाविधीचे पौरोहित्य केले. या वेळी उपस्थित साधकांनी चैतन्य आणि आनंद अनुभवून श्री राजमातंगीदेवीचे अस्तित्व अन् आशीर्वाद यांची अनुभूती घेतली. १७ मे या दिवशी प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायक मंदिराच्या मागे असलेल्या नर्दुल्ला टँक पटांगणात दुपारी ३.३० ते सायंकाळी ७.३० या वेळेत हा महायज्ञ होणार आहे.
🌼 सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रेरणेने…
भारताचे संरक्षण आणि लोककल्याण यांसाठी
🔥 ॥ श्री #राजमातंगी महायज्ञ ॥ 🔥🗓️ रविवार, 17 मे 2026
⏰ दु. 3:30 ते सायं. 7:30 वा.📍प्रभादेवी, मुंबई
🚩 आयोजक : सनातन संस्था
🌐 https://t.co/KQA6EViwo5 pic.twitter.com/GsfBqJoJrF— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) May 5, 2026

भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
ईरोडमध्ये (तमिळनाडू) ‘आयुष्य होम’ भावपूर्णरित्या पार पडला !
सनातन संस्थेच्या वतीने ‘सनातन संस्कार’ प्रशिक्षणवर्गाचे आयोजन !
विविध मंदिरांतील देवतांच्या चरणी सनातन संस्था आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञा”ची निमंत्रणपत्रिका अर्पण !
फलक आणि डिजिटल स्क्रीन यांद्वारे मुंबईत श्री राजमातंगी महायज्ञ सोहळ्याचा प्रभावी प्रचार !
इंद्रप्रस्थ सांस्कृतिक महोत्सवात सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद