‘ऑनलाईन’ सत्संग म्हणजे सामाजिक आरोग्यासाठी आशेचा किरण ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ सत्संगांच्या वर्षपूर्तीनिमित्त ‘कृतज्ञता सोहळा’ पार पडला. ‘ऑनलाईन’ सत्संगांविषयी अन्य संतांनी दिलेले आशीर्वाद, तसेच प्रेक्षकांनी दिलेल्या शुभेच्छा यांचे वाचन करण्यात आले. उपस्थित संत आणि मान्यवर यांनी सत्संगांमुळे समाजाला होणारे लाभ विशद केले.
