कोपरगाव येथील सप्तर्षि मळा परिसरातील हनुमान मंदिरातील प्रवचनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

कोपरगाव येथे हनुमान जयंतीनिमित्त विविध ठिकाणी नामसंकीर्तन, हनुमंताला साकडे आणि प्रवचन !

कोपरगाव येथील सप्तर्षि मळा परिसरातील हनुमान मंदिरात साकडे घालतांना भाविक

कोपरगाव (जिल्हा नगर) – हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत येणारी विघ्ने दूर होऊन परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना दीर्घारोग्य लाभावे, यासाठी शहरात विविध ठिकाणी नामसंकीर्तन आणि मंदिरात साकडे घालण्यात आले. येथील सप्तर्षि मळा परिसरातील हनुमान मंदिरात, तसेच बाजारतळ परिसरातील हनुमान मंदिरात नामसंकीर्तन करून साकडे घालण्यात आले. या वेळी स्थानिक हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक उपस्थित होते.

 

सप्तर्षि मळा परिसरातील हनुमान मंदिरातील प्रवचनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

येथील सप्तर्षि मळा परिसरातील हनुमान मंदिरात सनातन संस्थेच्या साधिका सौ. वनिता आव्हाड यांनी ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचन घेतले. या वेळी  ६० हून अधिक भाविक उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment