सनातन संस्थेचा कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना साहाय्य करण्यात सक्रीय सहभाग

कोल्हापूर – ‘कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरात साहाय्य करण्यात विविध संस्था आणि संघटना त्यांच्या परीने कार्यरत आहेत. यात सनातन संस्थेचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, तसेच धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ यांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांच्या कृपाछायेखाली साधना करणार्‍या साधकांनी आणि धर्मप्रेमींनी या पूरग्रस्तांना साहाय्य करून समाजासमोर आदर्शच निर्माण केला.

 

सनातन संस्थेचे साधक दांपत्य काकडे यांच्याकडून साहाय्य

सनातन संस्थेच्या साधिका सौ.सुरेखा काकडे यांच्याकडे दोन धर्मप्रेमी महिलांनी त्यांचे घर पावसामुळे घर गळत असल्याने साहाय्य मागितले. यावर श्री.आणि सौ.काकडे यांनी त्या दोन्ही महिलांना स्वतःच्या घरी आणून रात्री भोजन दिले. श्री.काकडे यांनी त्यांना पूरग्रस्तांच्या निवार्‍याच्या ठिकाणी नेऊन सोडले. हा प्रसंग झाल्यावर ‘अशा बिकट स्थितीत आम्हाला साधा चहाही कुणी विचारला नाही; मात्र तुम्ही आमच्यासाठी केलेले साहाय्य शब्दांत न सांगता येणारे होते’, असे त्या दोघींनी डोळ्यांत पाणी आणून सांगितले.

 

सनातन संस्थेच्या साधिकांकडून महिलांना साहाय्य

सनातन संस्थेच्या सौ. रूपा पाटील, सौ. घुरके, सौ. चौगुले या साधिकांनी पूरग्रस्तांसाठी रग, स्वेटर, तसेच महिलांसाठी आवश्यक अशा काही गोष्टी एकत्र केल्या आणि त्यांच्या परिसरात पूरग्रस्तांसाठी असलेल्या साहाय्यता केंद्रात नेऊन दिल्या.

उचगाव, तसेच अन्य भागांतील २५० हून अधिक
पूरग्रस्तांच्या साहाय्यासाठी सर्व धर्मप्रेमींकडून सूत्रबद्ध नियोजन

उचगाव येथे पूरग्रस्तांना साहाय्य करतांना सनातन संस्थेचे साधक, हिंदुत्वनिष्ठ,हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, तसेच अन्य

आपत्कालीन व्यवस्थापन समिती, उचगावच्या वतीने उचगाव येथील, तसेच अन्य भागांतील २५० हून अधिक पूरग्रस्तांसाठी विविध शाळांमध्ये रहाण्यासाठी सोय, तसेच भोजन, चहा-अल्पाहार यांची सोय करण्यात आली.

यात उचगाव ग्रामपंचायत, बंटीप्रेमी गट, शिवसेना, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान; विविध ज्ञाती संस्था यांसह हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी सहभागी झाले होते. या कार्यात माजी सरपंच श्री. मधुकर चव्हाण, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. विनायक हावळ, श्री. सतीश कांबळे, शिवसेना करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, माजी उपसरपंच श्री. अनिल शिंदे, युवासेना तालुकाप्रमुख श्री. भाऊ चौगुले, सर्वश्री विक्रम चौगुले, किरटी मसुटे, महेश जाधव, संजय चौगुले, शरद माळी, विराग करी, चंद्रकांत वळकुंजे आदी सहभागी झाले होते. अन्य ठिकाणांपेक्षा या ठिकाणी असलेले नियोजन हे सूत्रबद्ध असल्याने तेथील तलाठ्यांनी सर्वांचे कौतुक केले. सध्या १२ ऑगस्टपर्यंत असे साहाय्य चालू ठेवण्यात येणार आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment