सनातन संस्थेद्वारे फोंडा, गोवा येथे नवरात्री निमित्त विविध होमांचे आयोजन

‘हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना चांगले आरोग्य लाभावे आणि साधकांची साधना चांगली व्हावी’, या उद्देशाने सप्तर्षी जीव नाडीपट्टीत उल्लेख केल्याप्रमाणे सनातन संस्थेद्वारे नवरात्रीत फोंडा (गोवा) येथे विविध होम करण्यात येत आहेत.

देवद (पनवेल) येथे ‘श्री दुर्गामाता दौड’चा प्रारंभ आणि समारोप सनातन आश्रमात !

धर्मध्‍वजाचे पूजन सनातनच्या आश्रमातील साधक श्री. निनाद गाडगीळ (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के) यांनी केले, तसेच सनातन संस्‍थेच्‍या साधिकांनी औक्षण केले. श्रीफळ वाढवल्यानंतर शंखनाद करून दौड मार्गस्‍थ झाली.

अहिल्यानगर येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या ‘मंदिर न्यास जिल्हा अधिवेशन’ मध्ये सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव सहभागी !

मंदिर हे आपले ऊर्जा स्रोत आहेत. मंदिराच्या माध्यमातून समाजात सात्त्विकता निर्माण होते आणि ती सात्त्विकता आपल्याला व्यसनापासून दूर नेते. सध्या समाजात आपण पहातो तरुण पिढीला धर्माचे मार्गदर्शन राहिले नाही, हे मार्गदर्शन फक्त मंदिरातच मिळू शकते.

सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा धुळे येथील महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनात सहभाग

मंदिरांमधून धर्मशिक्षण दिल्यास राष्ट्रभक्ती असणारी पिढी निर्माण होईल ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

गरिबीमुळे नव्हे, तर धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदू धर्मांतर करतात ! – सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये

‘न मे भक्त: प्रणश्यति ।’ माझ्या भक्ताचा नाश होणार नाही. या भगवंताच्या वचनाला अनुसरून आपण साधना करून भगवंताचे भक्त बनलो, तर भगवंत आपली काळजी घेणारच आहे.

मी, माझे कुटुंब एवढेच संकुचित न रहाता राष्ट्र-धर्म यांच्यासाठी प्रत्येकाने १ घंटा वेळ देणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आज भारतामध्ये पंधरा लाख हिंदू धर्मांतर करत आहेत. साडेचार लाख मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. काही ठिकाणी मंदिरामध्ये जुगार खेळणे यासारखे गैरप्रकार होत असतात.

हिंदूंनी संघटित होण्यासमवेत राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आज धर्म धोक्यात आहे आणि जेव्हा धर्म धोक्यात असतो, तेव्हा आपणही धोक्यात असतो. अशा वेळी प्रत्येकाच्या वेळेचा त्याग पुष्कळ महत्त्वाचा ठरतो.

सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाड्ये यांनी विविध दिंडीप्रमुखांची घेतली भेट !

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर, आळंदीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांच्या हस्ते सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांचा शाल आणि श्रीफळ देऊन फलटण येथील पालखीतळावर सन्मान करण्यात आला

बेंगळुरू येथील भारतीय संत महापरिषदेत सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत पू. रामानंद गौडा सहभागी !

बेंगळुरू येथे १६ जून या दिवशी भारतीय संत महापरिषदच्या वतीने साधू-संतांची बैठक पार पडली. हिंदु धर्मावरील आघातांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि हिंदु मुलांना हिंदु धर्माचे शिक्षण देण्यासाठी भारतभरातील १ सहस्राहून अधिक संत या बैठकीत एकत्र आले होते.