सनातन संस्थेद्वारे फोंडा, गोवा येथे नवरात्री निमित्त विविध होमांचे आयोजन

‘राजमातंगी होमा’च्या वेळी करण्यात आलेली देवतांची मांडणी

फोंडा (गोवा) – ‘हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना चांगले आरोग्य लाभावे आणि साधकांची साधना चांगली व्हावी’, या उद्देशाने सप्तर्षी जीव नाडीपट्टीत उल्लेख केल्याप्रमाणे नवरात्रीच्या कालावधीत फोंडा (गोवा) येथे विविध होम करण्यात येत आहेत. २२ सप्टेंबर या घटस्थापनेच्या दिवसापासून विविध होमांना प्रारंभ करण्यात आला. या अंतर्गत ‘आयुष होम’, ‘राजमातंगी होम’ आणि ‘शूलिनी प्रत्यंगिरा होम’ करण्यात आले. या होमांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

बगलामुखीदेवीची आरती करतांना डावीकडून श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

Leave a Comment