मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत ४१५ प्रवचनांचा ४ सहस जिज्ञासूंनी घेतला लाभ !

मुंबई – सनातन संस्थेच्या वतीने ‘पितृपक्ष’ याविषयी घरोघरी प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले. ४ ते २१ सप्टेंबर या कालावधीत वरील जिल्ह्यात एकूण ४३५ ठिकाणी प्रवचने झाली. यामधून ४ सहस्रांहून अधिक जिज्ञासूंनी याचा लाभ घेतला. या प्रवचनांमध्ये श्राद्ध म्हणजे काय ? श्राद्धाचे महत्त्व, आपत्काळात श्राद्ध कसे करावे ? श्राद्ध न केल्याने काय अडचणी येऊ शकतात ? श्री दत्तगुरूंचा जप केल्याने काय लाभ होतो ? असे मार्गदर्शन करण्यात आले. जिज्ञासूंनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. ‘श्राद्धाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे’, ‘श्री गुरुदेव दत्त’ हा जप नियमित करू आणि श्रद्धेने श्राद्धविधी करू’, अशा प्रतिक्रिया अनेक जिज्ञासूंनी या वेळी दिल्या.
मंदिरे ही धर्मशिक्षण केंद्राची माध्यमे झाल्यास ‘लव्ह जिहाद’ला आळा बसेल ! – सद्गुरु स्वाती खाडये,...
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये,...
धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी साकडे आणि प्रतिज्ञा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कोल्हापूर येथे भव्य ‘हिंदु एकता दिंडी’ !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात ‘आयुष्य होम’ पार पडला