दापोली येथे सनातन संस्थेच्या वतीने साधनेविषयी मार्गदर्शन

दापोली, १८ ऑगस्ट (वार्ता.) – हिंदु समाज धर्म-संस्कृतीपासून दूर जात चालला आहे. त्याने पाश्चात्त्य विकृतीला कवटाळले आहे. त्यामुळे त्याला राष्ट्र-धर्म यांसमोरील समस्यांची जाणीव नाही. देश हिंदूबहुल असूनही हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण का होते ? हिंदु मुली ‘लव्ह जिहाद’ला का फसतात ? प्रतिवर्षी लाखो हिंदूंचे धर्मांतरण का होते ? याचे कारण हिंदू धार्मिकदृष्ट्या जागृत नाहीत, संघटित नाहीत, गरिबीमुळे हिंदू धर्मांतरित होत नाहीत, तर धर्मशिक्षणाचा अभाव हेच त्याचे मुख्य कारण आहे, असे प्रतिपादन सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.
जालगाव-ब्राह्मणवाडी येथील श्री महालक्ष्मी मंदिरात १४ ऑगस्टला जिज्ञासू, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ यांच्यासाठी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी यांनी केले. या मार्गदर्शनाचा लाभ ६५ जणांनी घेतला.
सद्गुरु स्वाती खाडये पुढे म्हणाल्या की,
१. गेल्या ७७ वर्षांत राजकारण्यानी समाजाला जातीपातीमध्ये गुंतवून ठेवले. हिंदू चारही बाजूने भरडला जातोय. भारताचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्र धर्मांधांचे आहे, ख्रिस्त्यांच्या फसव्या आणि खोट्या आमिषाला हिंदु भुलतात आणि धर्मांतरित होतात. धर्मशिक्षणामुळे हिंदू जागृत आणि संघटित होऊ शकेल.
२. हिंदु मुली, हिंदु मुलासमवेत लग्न करतांना अटी घालतात; मात्र मुसलमान तरुणांसमवेत जातात, त्या वेळी या अटी कुठे जातात ? धर्मांधांच्या दृष्टीने स्त्री भोग वस्तू आहे, तर हिंदु धर्मात स्त्रीचे पूजन होते. मुलगी ‘लव्ह जिहादला’ फसल्यावर आक्रोश करून काय उपयोग ? घराघरात धर्मशिक्षण आणि साधना शिकवली पाहिजे.
३. सध्याचा काळ आपत्काळ आहे. त्याला प्रत्येकाला सामोरे जावेच लागणार. यासाठी आपण साधनेची कास धरायला हवी. संघटित व्हायला हवे. ‘न मे भक्त: प्रणश्यति ।’ माझ्या भक्ताचा नाश होणार नाही. या भगवंताच्या वचनाला अनुसरून आपण साधना करून भगवंताचे भक्त बनलो, तर भगवंत आपली काळजी घेणारच आहे.

क्षणचित्रे :
१. कार्यक्रमानंतर झालेल्या गटचर्चेत धर्मप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. काहींनी कार्यक्रमातील अनुभूती सांगितल्या.
२. सकाळच्या सत्रात पालगड येथील धर्मप्रेमी श्री. विकास वेदक यांच्या घरी तेथील जिज्ञासूंसाठी सद्गुरु स्वाती खाडये यांनी साधनेविषयी मार्गदर्शन केले.
मंदिरे ही धर्मशिक्षण केंद्राची माध्यमे झाल्यास ‘लव्ह जिहाद’ला आळा बसेल ! – सद्गुरु स्वाती खाडये,...
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये,...
धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी साकडे आणि प्रतिज्ञा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कोल्हापूर येथे भव्य ‘हिंदु एकता दिंडी’ !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात ‘आयुष्य होम’ पार पडला