साक्षात् श्रीवामनावताराने स्थापन केलेली अदासा (जि. नागपूर) येथील शमी विघ्नेश्‍वराची श्री गणेशमूर्ती !

अदासा येथील श्री गणेशमूर्ती ही स्वयंभू असून तिची उंची १२ फूट, तर रुंदी ७ फूट आहे. हे मंदिर १ सहस्र वर्षांहून अधिक प्राचीन असून विदर्भातील अष्टगणेशांपैकी एक आहे.

२२२ वर्षांपासून सतत तेवत असणारा कर्णावती (गुजरात) येथील वैष्णव मंदिरातील दीप ! 

 कर्णावती येथील वैष्णव मंदिरात गेल्या २२२ वर्षांपासून एक दीप तेवत आहे. या दिव्याला ‘दीपकजी’ असे नाव देण्यात आले आहे.

मनाली, हिमाचल प्रदेश या ठिकाणी असलेले श्रीरामाचे कुलगुरु श्री वसिष्ठ ऋषी यांचे तपोस्थान !

ऋषी-मुनी सत्य सांगतात; म्हणून काळ त्यांच्या नावाला आणि शिकवणीला स्पर्श करू शकत नाही.

श्रीक्षेत्र नीरा-नृसिंहपूरचा महिमा

पुणे जिल्ह्याच्या आग्नेय दिशेला नीरा आणि भीमा या नद्यांच्या संगमतटावर श्रीक्षेत्र नीरा-नृसिंहपूर वसलेले आहे. ज्यांचे कुलदैवत नृसिंह आहे, त्यांनी या तीर्थक्षेत्री जाऊन श्री नृसिंहाचे दर्शन घ्यावे. पद्मपुराणात म्हटले आहे, हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू हिचे इंद्रदेवाने हरण केले. त्या वेळी कयाधू गर्भवती होती.

वाराणसी येथील संत कबीर प्राकट्य स्थळाचे छायाचित्रात्मक दर्शन

संत कबीर गुरूंच्या प्रतीक्षेत होते. त्यांनी वैष्णव संत स्वामी रामानंद यांना गुरु मानले; मात्र स्वामी रामानंद यांनी कबिरांना शिष्य मानण्यास नकार दिला. तेव्हा संत कबिरांनी मनोमन ठरवले की, स्वामी रामानंद पहाटे ज्या वेळी गंगास्नानास जातील, तेव्हा मी त्यांच्या मार्गात पायर्‍यांवर पडून राहीन. त्याप्रमाणे एकदा पहाटे ते स्वामी रामानंद यांच्या मार्गात पंचगंगा घाटावरील पायर्‍यांवर पडून राहिले. … Read more

एका रात्रीत दिशा पालटलेले बिहारमधील सूर्यमंदिर !

कोणार्कचे जगप्रसिद्ध असे सूर्यमंदिर सुपरिचित आहे. असेच एक कलात्मक मंदिर बिहारच्या औरंगाबाद येथील देव येथेही आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे देशातील सर्व सूर्यमंदिरे पूर्वाभिमुख असतांना सूर्याचे हे एकमेव मंदिर पश्‍चिमाभिमुख आहे.

एका शिवभक्ताला केदारनाथ यात्रेत आलेले कटू अनुभव !

केदारनाथ म्हणजे हिंदूंचे श्रद्धास्थान ! हे चारधाम यात्रेतील महत्त्वपूर्ण ठिकाण आहे.वर्ष २०१३ च्या आपत्काळानंतर तेथील परिस्थिती कशी आहे ?, हे पहाण्यासाठी मी आणि आमचे काही स्नेही यांनी ही यात्रा करायचे ठरवले. तेथे गेलो असता मोठ्या श्रद्धेने केदारनाथाच्या दर्शनासाठी आलेल्या यात्रेकरूंना यात्रेच्या काळात कसा त्रास सहन करावा लागतो ?, याचे कटू अनुभव आम्हाला आले.

आळंदी

आळंदीत जर विशिष्ट उपकरणे (मीटर्स) घेऊन गेलो, तर ठराविक दिवशी, ठराविक वेळी, ठराविक काळी आणि ठराविक प्रहरामध्ये तेथील चैतन्य आपल्याला त्याने मोजता येते.

ईश्‍वर असल्याची साक्ष देणारे चित्तूर (आंध्रप्रदेश) येथील कनिपकम् विनायक मंदिर !

आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात असलेले कनिपकम् विनायक मंदिर हे स्वयंभू गणेशमूर्ती आणि अनेक आख्यायिका यांमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. चोल वंशाच्या राजाने ११व्या शतकात हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. विजयनगरच्या राजाने वर्ष १३३६ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला.

मनुष्याला २३ पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन केल्याचे पुण्य देणारी अमरनाथ यात्रा !

धार्मिक मान्यतेनुसार अमरनाथ गुहेतील बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेतल्याने काशीमध्ये घेतलेल्या दर्शनापेक्षा १० पट, प्रयागपेक्षा १०० पट आणि नैमिषारण्यापेक्षा १ सहस्र पट अधिक पुण्य लाभते. म्हणूनच आजही कोट्यवधी हिंदू मोठ्या भक्तीभावाने अमरनाथ यात्रा करतात.