विश्वातील दुसरे सर्वांत मोठे शक्तिपीठ म्हणजे रजरप्पा (झारखंड) येथील श्री छिन्नमस्तिकादेवी !
झारखंडची राजधानी रांची येथून ८० किलोमीटर अंतरावर रामगढ जिल्ह्यात असलेल्या रजरप्पा गावामध्ये श्री छिन्नमस्तिका देवीचे जगप्रसिद्ध मंदिर आहे. भारतातील प्राचिन मंदिरांपैकी हे एक असून भैरवी आणि दामोदर या नद्यांच्या संगमावर हे मंदिर वसलेले आहे.
