श्रद्धा आणि भक्ती यांचे उत्कट दर्शन घडवणारी जगन्नाथ रथयात्रा !

जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रा म्हणजे भगवान श्री जगन्नाथाच्या अर्थात् जगदोद्धारक भगवान श्रीकृष्णाच्या भक्तांसाठी जणू महापर्वणीच ! केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील भाविकांची रीघ असलेली ही यात्रा श्रद्धा आणि भक्ती यांचे उत्कट दर्शन घडवते.

गुर्वाज्ञापालनाने गुरुकृपा संपादन करणारे ब्रह्मचैतन्य प.पू. गोंदवलेकर महाराज !

गणुबुवा देहाभिमानशून्य झाल्याची तुकामाईंची निश्‍चिती झाली. त्यांनी गणपतबुवांच्या मस्तकी हात ठेवला आणि त्यांचे ब्रह्मचैतन्य, असे नाव ठेवले. हे गणुबुवा म्हणजेच प.पू. गोंदवलेकर महाराज

राष्ट्राची उन्नती आणि रक्षण यांसाठी अव्याहतपणे समाजप्रबोधन करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज !

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होऊन गेले. भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी त्यांची श्रद्धा आणि विचारसरणी होती. देशातले तरूण हे नीतिमान आणि सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचं उपदेशपर अन् मार्गदर्शनपर लेखन त्यांनी केलं..

हिमाचल प्रदेशातील भलेई माता मंदिरातील मूर्तीला घाम आल्यास मनोकामना पूर्ण होत असल्याची भक्तांची श्रद्धा !

शिमला, हिमाचल प्रदेशातील भलेई माता मंदिरच्या संदर्भात येथील भक्तांची श्रद्धा आहे की, येथील देवीच्या मूर्तीला घाम आल्यास भाविकांची मनोकामना पूर्ण होते..

उत्तराखंड येथील कसारदेवी मंदिराच्या क्षेत्रातील भू-गर्भीय लहरींचे नासाकडून संशोधन !

अल्मोडा जिल्ह्यातील कसारदेवी मंदिराच्या शक्तीमुळे विज्ञानवादी चकीत झाले आहेत..

सॅन्टोस यांना शांततेचे नोबेल पारितोषिक मिळण्यामागे श्री श्री रविशंकर यांची प्रेरणा !

कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष जूआन सॅन्टोस श्री श्री रविशंकर यांच्याविषयी गौरवोद्गार काढतांना म्हणाले, या शांतता करारासाठी आपण जे कष्ट घेतले त्याविषयी आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत. या घटनेला तुमचे समर्थन आणि मैत्रीच कारणीभूत आहे.

मुलांचे किंवा वास्तूचे नाव ठेवतांना ते सात्त्विकच असावे !

शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात, या नियमाप्रमाणे नाव ठेवतांना नेहमी सात्त्विकच ठेवावे; कारण यातून मिळणार्‍या दैवी स्पंदनांचा आपल्याला लाभ होत असतो..

मंदिरातील फरशीवर झोपून राहिल्याने महिलांना होते अपत्यप्राप्ती ! – देवीभक्तांची श्रद्धा

मंडी जिल्ह्यातील सिमस गावात सिमसा माता देवीचे मंदिर आहे. ही देवी अपत्यहीन महिलांची मनोकामना पूर्ण करणारी म्हणून संतान दात्री या नावाने ओळखली जाते..

देवीचे माहात्म्य !

देवीच्या उपासनेची परंपरा पुष्कळ पूर्वीपासून भारतात चालत आलेली आहे. देवीचे मूळ रूप निर्गुण असले, तरी तिच्या सगुण रूपाची उपासना करण्याची परंपरा भारतात प्रचलित आहे. उपासकांच्या हृदयात देवीला विशेष स्थान असल्यामुळेच प्रतीवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने भारतभर साजरा केला जातो.