योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी स्थापन केलेले शेवगाव येथील जागृत दत्तमंदिर !

गाभार्‍यातील प्रसन्न, बोलकी, निरागस आणि वात्सल्यमय तेजस्वी मूर्ती योगतज्ञ दादाजींनी स्वत: जयपूर येथे जाऊन बनवून आणली आहे. २४.५.२००६ या दिवशी त्यांच्या हस्तस्पर्शाने दत्तमूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा मंगलमय वातावरणात झाला होता.

श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथील आद्य दत्तपीठ : वरद दत्तात्रेय मंदिर !

‘महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथे गोदावरीच्या पात्रात श्री पांचाळेश्वर मंदिर आहे. श्री नृसिंह सरस्वती यांनी गुरुचरित्रात या स्थळाचा उल्लेख केलेला आहे. ‘येथे श्री दत्तगुरु प्रतिदिन दुपारच्या भोजनासाठी सूक्ष्मातून येतात’, असे या क्षेत्राचे माहात्म्य आहे.

अंगारक चतुर्थीचे माहात्म्य !

श्री गणेशाच्या उपासकांमध्ये अंगारक चतुर्थीला अधिक महत्त्व असते. त्या दृष्टीने आज अंगारक चतुर्थीचे माहात्म्य सांगणारी पूर्वी घडलेली एका गणेशभक्ताची कथा येथे देत आहोत.

जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील वैशिष्ट्यपूर्ण पैलू !

‘श्रीकृष्णाचे पालक पिता नंद हे ‘आभीर’ जातीचे होते. त्यांना आज ‘अहीर’ या नावाने ओळखले जाते. श्रीकृष्णाच्या जन्मदात्या पित्याचे नाव वसुदेव होते.

विविध देवतांचे कार्य आणि वैशिष्ट्ये

खालील लेखात विविध प्रकारच्या देवता आणि त्यांचे कार्य यांविषयी माहिती दिली आहे. ही माहिती वाचून प्रत्येक देवतांचे कार्य हे वेगळे कसे असते, त्यांच्या मर्यादा आणि या शक्ती कोणत्या अनिष्ट शक्तींशी सूक्ष्म-युद्ध करून लढतात, याविषयी सारणी दिली आहे. यावरून वास्तुदेवता, स्थानदेवता, ग्रामदेवता आणि उच्चदेवता यांचे मनुष्याच्या जिवनातील महत्त्व आपल्या लक्षात येईल. धर्माच्या अभ्यासकांना विनंती ! सनातन … Read more

गायत्रीदेवीचे आध्यात्मिक महत्त्व आणि तिची गुणवैशिष्ट्ये !

आपल्याला गायत्रीमंत्र माहिती आहे. आपल्यापैकी काही जण या प्रचलित मंत्राचा जपही करतात. ५.६.२०१७ या दिवशी ‘गायत्री जयंती’ आहे. त्यानिमित्त गायत्रीदेवीची चरणी कोटी कोटी प्रणाम करून तिच्या संदर्भातील माहिती आपण जाणून घेऊया.

शनैश्‍चर देवाचे माहात्म्य, त्याची वैशिष्ट्ये !

२५.५.२०१७ या दिवशी, म्हणजे वैशाख अमावास्येला शनैश्‍चर जयंती आहे. त्यानिमित्त शनिदेवाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. शनैश्‍चर जयंतीचे औचित्य साधून लिहिलेल्या या लेखातून आपण शनिदेवाची महती जाणून घेऊया.

भक्ताच्या प्रेमशक्तीचे श्रेष्ठत्व दाखवून देणारा नृसिंह अवतार !

भगवान श्रीविष्णूंचा चौथा अवतार, म्हणजे नृसिंह अवतार होय. ९.५.२०१७ या दिवशी नृसिंह जयंती आहे. विदर्भात आणि उर्वरित महाराष्ट्रात अनेकांचे कुलदैवत लक्ष्मीनृसिंह आहे. त्या निमित्ताने नृसिंहाची आध्यात्मिक माहिती देणारा हा लेख प्रकाशित करत आहोत.

‘रामसे बडा रामका नाम’ ही म्हण सार्थ ठरवणारा भक्तशिरोमणी हनुमान !

‘जो कुणी प्रभु श्रीरामाचे स्मरण करत असेल, त्याचे संरक्षण हनुमंत करील आणि कुणीही त्या व्यक्तीचे अहित करू शकणार नाही’, असा वर हनुमानाने मागितला.

श्री गणेश जयंती

गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. माघ शुद्ध चतुर्थी ही ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते.