हिंदु धर्मातील यज्ञातील हवनातून निर्माण होणारा धूर आणि इतर कारणांमुळे निर्माण होणारा धूर

येथे यज्ञामुळे वातावरण आणि मानव यांच्यावर कसा चांगला परिणाम होतो, याचे सविस्तर विवेचन केले आहे. यज्ञाचे लाभ समजावेत, यासाठी यज्ञाचा धूर आणि प्रदूषण करणारे हानीकारक धूर यांची तुलना केली आहे. हे विवेचन सर्वांसाठीच बोधकारक आहे. विशेषकरून पुरोगामी आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांनी ते समजून घ्यावे; कारण ते नेहमी यज्ञाच्या विरोधात बोलतात. त्यांनी पुढील गोष्टींचा विचार करून हे विवेचन वाचावे.

सौ. रंजना गडेकर
सौ. रंजना गडेकर

१. बुद्धीप्रामाण्यवादी सर्व गोष्टींना एका मापात तोलतात. ते सात्त्विकता-तामसिकता लक्षात घेत नाहीत. त्यामुळे त्यांना कारखान्यांतून निघणारा धूर आणि यज्ञातून निर्माण होणारा धूर सारखाच वाटल्यास नवल नाही.

२. ते यज्ञाच्या धुरातील घटक कोणते आणि प्रदूषण करणार्‍या धुरातील घटक कोणते, याचाही विचार करत नाहीत, म्हणजेच ते बुद्धीचा उपयोग करत नाहीत.

३. ते हिंदु धर्माचे वैरी असल्याप्रमाणे वागतात. ऋषी-मुनींनी उगाचच आणि वायफळ व्यय (खर्च) कारण्यासाठी यज्ञ सांगितले आहेत का ? बुद्धीप्रामाण्यवादी यज्ञांचा सूक्ष्मातील आणि व्यापक लाभ का समजून घेत नाहीत ? यज्ञ म्हणजे काही समिधा, तूप इत्यादी अनावश्यक जाळणे नव्हे ! त्यामध्येही अध्यात्मशास्त्र आहे. कोणत्या लाभासाठी कोणती हवनीय द्रव्ये हवीत, हे ठरलेले आहे, उदा. लाह्यांची आहुती दिल्याने हवनकर्त्याला यश आणि बुद्धी मिळते, मोदकांच्या हवनाने इच्छित फळ मिळते, तिळाच्या हवनाने सर्वसाधारण लाभ होतात इत्यादी. असे विविध लाभ करवून देणारे शेकडो यज्ञ धर्मग्रंथांत सांगितले आहेत. इतके हे शास्त्रशुद्ध असतांना यज्ञांना नाहक विरोध का ?

४. यज्ञ न करता यज्ञाला होणारा व्यय (खर्च) गरिबांकरता केल्यास त्या त्या यज्ञाचे ते ते फळ मिळेल का ? प्रत्येक गोष्ट योग्य कारणासाठी केली, तरच तिचा योग्य तो परिणाम होतो. भूक लागली, तर कोणी पाणी पिते का ? त्यासाठी अन्नच पाहिजे.

५. बुद्धीप्रामाण्यवाद्यांना सूक्ष्मातील कळत नाही, हे मान्य आहे; पण ते सूक्ष्मातील परिणाम काही प्रमाणात स्थुलातून दाखवून देणार्‍या विज्ञानाचाही उपयोग करत नाहीत आणि नाहक वाद घालतात. आता तशी वैज्ञानिक उपकरणे उपलब्ध आहेत, उदा. पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी (पिप), रेझोनेन्ट फिल्ड इमेजिंग (आर्.एफ्.आय.), इलेक्ट्रो-मॅग्नेटिक फील्ड मापक, युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर इत्यादी.

        पुरोगामी आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांना हे पटत असेल, तर त्यांना पुढील सूत्रे सहजतेने आकलन होतील आणि यज्ञाचे महत्त्व पटेल.

table_1

– सौ. रंजना गौतम गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी (३.७.२०१५)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात