गुरुकुल शिक्षणपद्धती

आजवर आपण अनेकदा भारतातील प्राचीन गुरुकुल पद्धतीविषयी ऐकले असेल. या शिक्षण पद्धतीत गुरूंच्या घरी जाऊन शिक्षण घेणे, एवढाच अर्थ आपणांस ठाऊक असतो. गुरुकुल म्हणजे नेमके काय, तेथील दिनचर्या, अध्यापन पद्धती काय असते, आदी माहिती होण्यासाठी उदाहरणादाखल एका गुरुकुल पद्धतीची माहिती येथे देत आहोत.

आनंददायी शिक्षणपद्धत कशी असावी ?

  वर्तमानात अभ्यास करून मुले खरेच आनंदी होत आहेत का ? शाळा चालू होऊन एक महिनाच होत आहे. तरीही शाळेच्या धकाधकीच्या वेळापत्रकामुळे मुले त्रस्त झालेली असतात. ‘कधी एकदा शाळा सुटते’, असे त्यांना सततच वाटत असते. परीक्षांच्या काळातही पाठ्यपुस्तकांतील सारखे तेच तेच परिच्छेद वाचून ती अतिशय कंटाळून जातात. ‘परीक्षा संपल्या की, कुठेतरी मस्तपैकी जाऊन मजा करून यायला … Read more

मुलांसाठी गुरुकुल शिक्षणपद्धत आवश्यक आहे का ?

मुलांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी गुरुकुल शिक्षणपद्धत आवश्यक ! पूर्वीच्या काळी गुरुकुलात मुलांना प्रथम अध्यात्मशिक्षण आणि नंतर ६४ कलांपैकी २ – ३ कलांचे शिक्षण दिले जायचे. अहंभाव वाढण्याआधीच मुलांना अध्यात्माचे शिक्षण दिल्यास त्यांच्यावर सात्त्विक संस्कार होऊन आध्यात्मिक उन्नती होते.

समर्थ रामदासस्वामींना त्यांच्या आजारावरील उपाय म्हणून वाघिणीचे दूध आणून देणारे छत्रपती शिवाजी महाराज !

शिवाजीराजे प्रत्येक गुरुवारी समर्थांचे दर्शन घेतल्याविना भोजन करत नसत. एके दिवशी राजे समर्थांच्या दर्शनार्थ निघाले असता महाबळेश्‍वरच्या रानात समर्थ असल्याचे त्यांना समजले. समर्थ दर्शनार्थ कितीही कष्ट पडले, तरी त्याची खंत ते मानत नसत.

समर्थ रामदासस्वामी आणि मारुति यांच्या कथेतून प्रतीत होणारा सद्गुरु महिमा

समर्थ रामदासस्वामी आणि मारुति यांच्या कथेतून प्रतीत होणारा सद्गुरु महिमा. त्रैलोक्यात सद्गुरुच श्रेष्ठ आहेत. त्यांच्या कृपाशीर्वादाविना कोणतेही कार्य होऊच शकणार नाही. श्रीरामाच्या आशीर्वादाविना सीतेचा शोध घेणे किंवा लंकेत जाणे शक्य नव्हते. शेवटी काय, ईश्‍वर हाच सद्गुरु अन् सद्गुरु हाच ईश्‍वर !

गुरूंच्या आज्ञेचे पालन करून त्यांचे मन जिंकणारा उपमन्यू !

धौम्यऋषींचा शिष्य उपमन्यू हा गुरुगृही राहून आश्रमातील गायी सांभाळण्याची सेवा करत असे. तो भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करी. त्याची परीक्षा पहाण्यासाठी एकदा धौम्यऋषींनी मिळालेल्या भिक्षेतील अर्धी भिक्षा गुरूंना द्यावी आणि उरलेल्या भिक्षेवर निर्वाह करावा, असे त्याला सांगितले.

श्री पंच अग्नि आखाडा

नाशिक येथे ऑगस्ट २०१५ मध्ये पार पडलेल्या सिंहस्थपर्वात दैनिक सनातनचे प्रतिनिधी श्री. सचिन कौलकर यांनी त्र्यंबकेश्‍वर (जिल्हा नाशिक) येथे श्री पंच अग्नि आखाड्याचे संत आचार्य महामंडलेश्‍वर ब्रह्मर्षी श्रीमद् रामकृष्णानंद महाराज आणि येवला (जिल्हा नाशिक) तालुक्यातील दत्तवाडी गावातील खडेश्‍वर सेवा आश्रमाचे श्री सद्गुरु उमाकांत उपाख्य खडेश्‍वर महाराज यांच्याशी केलेल्या वार्तालापात उभय महाराजांनी त्यांच्या आखाड्याविषयी दिलेली माहिती … Read more

श्री शंभू पंचदशनाम आवाहन आखाडा

उज्जैन सिंहस्थपर्वानिमित्त.. नाशिक येथे ऑगस्ट २०१५ मध्ये पार पडलेल्या सिंहस्थपर्वात दैनिक सनातनचे प्रतिनिधी श्री. सचिन कौलकर यांनी श्री शंभू पंचदशनाम आवाहन आखाड्याचे महासचिव आणि काशी येथील श्री महंत सत्यगिरि महाराज यांच्याशी केलेल्या वार्तालापात महाराजांनी आखाड्यांविषयी दिलेली माहिती येथे देत आहोत. संकलक : श्री. सचिन कौलकर १. आखाड्याची स्थापना, त्यांचे इष्टदैवत आणि नित्यसाधना त्र्यंबकेश्‍वर (जिल्हा नाशिक) … Read more

श्री तपोनिधी निरंजनी आखाडा

श्री तपोनिधी निरंजनी आखाड्याची स्थापना संवत ९६० (वर्ष ९०४) मध्ये कच्छमधील मांडवी येथे झाली. कार्तिकस्वामी हे या आखाड्याचे इष्टदेव आहेत.