सप्तम ‘अखिल भारतीय हिदू अधिवेशना’ला उपस्थित हिदुत्वनिष्ठांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट !
अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली.
अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली.
डॉ. श्रीनारायण सिंह यांना वर्ष २०१३ मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून ‘तोंडखुरी पायखुरी’ या गायीच्या लसीच्या शोधासाठी प्रतिष्ठित ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.
परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे संपूर्ण भारतात प्रथम क्रमांकाचे कार्य करत आहेत. सनातन संस्थेच्या माध्यमातून केले जाणारे धर्मप्रसार आणि संस्कार यांचे कार्य, तसेच भारतात रामराज्य येणाच्या दृष्टीने करण्यात येणारे कार्य पुढे अधिक वाढण्यासाठी शुभेच्छा !,
९ फेब्रुवारी या दिवशी कामोठे येथे रायगड जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांची हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. शिवाजी वटकर आणि सनातन संस्थेच्या सौ. संगीता लोटलीकर यांनी सदिच्छा भेट घेतली. या वेळी पनवेलचे आमदार श्री. प्रशांत ठाकूर हेही उपस्थित होते.
बेंगळुरू येथे सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त, म्हणजेच १३ फेब्रुवारीला सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक वस्तूंचे प्रदर्शन लावले होते. त्या प्रदर्शनाला केंद्रीय संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी नुकतीच भेट दिली.
सनातन संस्थेने हिंदुत्व जागृतीकरता जे आध्यात्मिक कार्य हाती घेतले आहे, ते अतिशय योग्य असून प्रभावी आहे. सनातनचा आश्रम अप्रतिम आहे. समस्त भारतवासीय आणि विदेशी यांनी जर या आश्रमाला भेट दिली, तर त्यांचीही ईश्वराप्रती श्रद्धा दृढ होईल आणि तेही साधना करायला लागतील.
कार्यक्रमाच्या ठिकाणी लावलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन पाहून स्वामीजींनी सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्याविषयी ‘‘कर्नाटकमध्ये झालेल्या समितीच्या सभेला मी गेलो होतो. समितीने संघटन चांगले केले आहे. तुमच्या गुरुदेवांना हा प्रसाद द्या आणि हे अर्पणरुपी आशीर्वाद द्या’’, असे म्हणून ५० रुपये आणि खडीसाखरेचा प्रसाद दिला.
कळंबोली येथील बिमा कॉम्प्लेक्स येथे सनातन संस्थेच्या वतीने धर्मरथावर सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या विक्रीकेंद्राचे उद्घाटन सह्याद्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. संतोष वर्तक आणि भाजपचे पनवेल शहर चिटणीसपदावर श्री. अशोक मोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
आश्रमातील साधक व्यष्टी साधनेअंतर्गत राबवत असलेली स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रिया यांविषयी सौ. नंदिनी बोंडाळे अत्यंत प्रभावित झाल्या आणि हे प्रयत्न स्वतः करण्याच्या दृष्टीने त्यांनी आश्रमात चालणार्या स्वभावदोष अन् अहं निर्मूलन सत्संगात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित केली.
रामनाथी (गोवा) १७ जानेवारी या दिवशी डोंबिवली, ठाणे येथील विशाखा नृत्यालयाच्या संचालिका सौ. ज्योती शिधये या त्यांच्या १४ विद्यार्थिनींसह रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्या आहेत. सौ. ज्योती शिधये या कथ्थक नृत्य करणार्या नामांकित नृत्यांगना आहेत.