बेंगळुरू येथील प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शिका सौ. पद्मश्री जोसलकर यांची सनातनच्या गोवा येथील आश्रमाला भेट
बेगळुरू (कर्नाटक) येथील प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शिका सौ. पद्मश्री जोसलकर यांनी सनातन संस्थेच्या गोवा येथील आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली.
बेगळुरू (कर्नाटक) येथील प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शिका सौ. पद्मश्री जोसलकर यांनी सनातन संस्थेच्या गोवा येथील आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली.
नाथ संप्रदायातील मच्छिंद्रनाथ यांच्यानंतर त्यांच्या स्थानी १६ वे पदाधिकारी म्हणून कार्यरत असलेले अकोला येथील प.पू. नरेंद्रनाथ महाराज आणि पुणे येथील शारदाज्ञानपीठम्चे संस्थापक आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसंतराव गाडगीळ यांनी १५ डिसेंबर या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
कोल्हापूर येथील गोभक्त ह.भ.प. हरिदास कुळकर्णी यांनी १० डिसेंबर या दिवशी गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. कै. ह.भ.प. दत्तदास घागबुवा यांचे शिष्य आहेत. ते गोवंश रक्षा आणि गोवंश हत्या या विषयावर कीर्तनाच्या माध्यमातून जागृती करतात.
प्रत्यक्ष प्रमाण मानणार्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना अध्यात्मशास्त्राचे महत्त्व कळावे, तसेच समाजालाही धर्मशिक्षण मिळावे यासाठी सर्वाश्रम वैश्विक ऊर्जा संशोधन केंद्र या संस्थेचे श्री. संतोष जोशी अध्यात्मशास्त्रीय संशोधन करण्याचे कार्य करत आहेत.
अखिल भारतीय संत समितीचे अध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातनचे साधक श्री. चेतन राजहंस यांनी त्यांना आश्रमात चालणारे राष्ट्र, धर्म आणि आध्यात्मिक संशोधन यांच्या कार्याविषयी परिचय करून दिला.
सनातन संस्थेचे कार्य आणि आश्रमातील सर्व व्यवस्था पाहून जैनमुनी पू. विनम्रसागरजी महाराज अतिशय प्रभावित होऊन म्हणाले, कोणाला एम्बीएचा कोर्स करायचा असेल, तर त्याने महाविद्यालय सोडून येथे यायला हवे.
जालंधर (पंजाब) येथील श्री अनंत श्री विभूषित श्री दण्डी स्वामी श्री शिवबोधाश्रम(श्री रमेशाश्रम)जी महाराज यांनी रामनाथी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
रामनाथी, येथील सनातनच्या आश्रमाला २ विदेशी वैज्ञानिकांनी भेट दिली. आश्रमात ठिकठिकाणी घडणार्या घडामोडींचे आध्यात्मिक दृष्टीकोनातून संशोधन करून त्याचे जतन केलेले पाहून ते प्रभावित झाले आणि त्यांनी त्याची प्रशंसाही केली.
ह.भ.प. कोकरे महाराज यांनी आश्रमभेटीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले की, सनातनचे कार्य संपूर्ण जगातील हिंदूंना प्रेरणादायी आहे. हा आश्रम नसून पृथ्वीवर भगवंताने धर्मराज्यासाठी उघडलेला धर्मदरबार आहे.
सनातन संस्थेचे कार्य म्हणजे शाश्वताचे वैभव आहे. या कार्याला कोणीही बंधने घालू शकत नाही, असे गौरवोद्गार कोल्हापूर जिल्ह्यातील शिवशक्ती सिद्धपीठ सह्याद्री पहाड ट्रस्ट-मुक्तानंद तीर्थस्थळ आश्रमाचे प.पू. स्वामी गणेशानंद परमहंस यांनी काढले.