नाशिक येथील अधिवक्ता विजय कुलकर्णी यांची रामनाथी येथील सनातन आश्रमाला भेट

रामनाथी (गोवा) – ओझर, नाशिक येथील अधिवक्ता (नोटरी) श्री. विजय कुलकर्णी यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहकुटुंब भेट दिली. अधिवक्ता श्री. विजय कुलकर्णी यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी अधिवक्त्या सौ. वैदेही कुलकर्णी, मुलगे श्री. विपीन आणि कु. शुभम अन् मुलगी कु. ऋतुजा उपस्थित होते. सनातनचे साधक अधिवक्ता श्री. नागेश ताकभाते यांनी त्यांना आश्रमात चालणार्‍या राष्ट्र आणि धर्म कार्यासंदर्भात माहिती दिली.

आश्रम पाहून आत्मविश्‍वास निर्माण झाला ! – अधिवक्ता कुलकर्णी

डावीकडून अधिवक्त्या सौ. वैदेही कुलकर्णी, कु. शुभम कुलकर्णी, कु. ऋतुजा कुलकर्णी आणि अधिवक्ता श्री. विजय कुलकर्णी यांना सनातन नियतकालिकांविषयी माहिती देतांना अधिवक्ता नागेश ताकभाते

रामनाथी आश्रम पाहून अधिवक्ता श्री. विजय कुलकर्णी भारावले. यासंदर्भात अभिप्राय व्यक्त करतांना ते म्हणाले, आश्रमातील शिस्त आवडली. आश्रमात वेगळा अनुभव आला, प्रसन्नता वाढली, वेगळा आत्मविश्‍वास निर्माण झाला, आनंद आणि समाधान लाभले. सनातनचे कार्य अद्वितीय आणि विशाल आहे. प.पू. डॉ. आठवले यांनी अल्प कालावधीत हे कार्य उभे केले आहे. सनातन संस्थेच्या या कार्यात कायमस्वरूपी सेवेत रहावे, अशी इच्छा निर्माण झाली आहे.

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’