
रामनाथी – कोल्हापूर येथील गोभक्त ह.भ.प. हरिदास कुळकर्णी यांनी १० डिसेंबर या दिवशी गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांना सनातनचे साधक श्री. विशाल देशपांडे यांनी आश्रमात चालणार्या राष्ट्र आणि धर्म विषयक कार्य, तसेच आध्यात्मिक संशोधन यांविषयी माहिती दिली. आश्रम पाहिल्यावर ह.भ.प. कुळकर्णी म्हणाले, आज सनातनच्या आश्रमाला भेट देऊन आनंद झाला. तो आनंद शब्दरूपी लिहून देण्यास माझी लेखणी असमर्थ आहे.
या प्रसंगी सनातनचे साधक श्री. प्रकाश मराठे यांनी ह.भ.प. कुळकर्णी यांचा शाल श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार केला.
परिचय
गोभक्त ह.भ.प. हरिदास कुळकर्णी कै. ह.भ.प. दत्तदास घागबुवा यांचे शिष्य आहेत. ते गोवंश रक्षा आणि गोवंश हत्या या विषयावर कीर्तनाच्या माध्यमातून जागृती करतात. त्यांनी ओरिएन्टल हेरिटेज ऑफ द वर्ल्ड मध्येही व्याख्यान दिले आहे.
संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’
कोल्हापूर येथील डॉ. अश्विनी माळकर आणि श्रीमती शीलाताई माने यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट...
नागपूर-वणी येथील सुप्रसिद्ध शिल्पकार तथा मूर्तीकार अशोक सोनकुसरे यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
सनातनचा आश्रम देशभरातील हिंदूंना योग्य दिशा देण्याचे काम करतो ! – खासदार डॉ. अनिल बोंडे
अधिवक्ता आलोक कुमार यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट !
राजस्थानचे प्रसिद्ध उद्योजक आणि ‘लघुउद्योग भारती’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष ताराचंद गोयल यांची गोव्यातील सनातन आश्रमाला सदिच्छा...
प्रसिद्ध लेखक शंतनू गुप्ता यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहकुटुंब सदिच्छा भेट !