रामनाथी – बेंगळुरू (कर्नाटक) येथील प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शिका सौ. पद्मश्री जोसलकर यांनी सनातन संस्थेच्या गोवा येथील आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांना सनातनचे डॉ. दुर्गेश सामंत यांनी आश्रमात चालणारे राष्ट्र आणि धर्म विषयक कार्य, तसेच आध्यात्मिक संशोधन यांविषयी अवगत केले. आश्रम पाहिल्यावर सौ. जोसलकर म्हणाल्या, सनातन संस्थेकडून जे कार्य केले जाते, त्याविषयी मला कल्पना नव्हती. आश्रम पाहिल्यावर येथील विविध विभागांमध्ये चाललेले कार्य पाहून आनंद झाला. विशेषत: संस्थेकडून प्रकाशित करण्यात आलेली देवतांची सात्त्विक चित्रांची माहिती अतिशय चांगली आहे.

परिचय : सौ. जोसलकर भारताच्या नाट्य क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तीमत्त्व आहेत. त्या प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शिका असून नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी देहली येथील स्नातक आहेत, तसेच कर्नाटकातील प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक गुब्बी विरन्ना यांच्या त्या नात आहेत.
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री मोहिनी पोतदार यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !