श्री शिवबोधाश्रम (श्री रमेशाश्रम)जीयांची सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

जालंधर (पंजाब) येथील श्री अनंत श्री विभूषित श्री दण्डी स्वामी
श्री शिवबोधाश्रम (श्री रमेशाश्रम)जी यांची रामनाथी,गोवा येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

डावीकडून श्री रमेशाश्रम महाराज, <br/> श्री. रूपेश रेडकर आणि कॅप्टन मुल्कराज बिर्ला

डावीकडून श्री रमेशाश्रम महाराज,
श्री. रूपेश रेडकर आणि कॅप्टन मुल्कराज बिर्ला

रामनाथी (गोवा) – दण्डी आश्रम, जालंधर (पंजाब) येथील श्री अनंत श्री विभूषित श्री दण्डी स्वामी श्री शिवबोधाश्रम (श्री रमेशाश्रम)जी महाराज यांनी १० फेब्रुवारी या दिवशी रामनाथी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातनचे श्री. रूपेश रेडकर यांनी त्यांना आश्रमात चालणार्‍या राष्ट्र आणि धर्म कार्याविषयी माहिती दिली. या प्रसंगी त्यांच्या समवेत कॅप्टन मुल्कराज बिर्ला उपस्थित होते.

परिचय

श्री अनंत श्री विभूषित श्री दण्डी स्वामी श्री शिवबोधाश्रम (श्री रमेशाश्रम)जी महाराज यांनी वेद, वेदांग, उपनिषद आणि पुराण साहित्य यांचा सखोल अभ्यास करून श्री गुरुवंश पुराण हा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथात त्यांनी प्राचीन ऋषी-महर्षि यांच्या जीवन चरित्रांसोबतच वर्तमानकाळातील वैदिक परंपरेतील संन्यासी आणि गुरु यांच्याविषयी लेखन केले आहे.

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment