‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्यासाठी मुंबईमध्ये झालेल्या हिंदु जनआक्रोश मोर्च्यात सनातन संस्था सहभागी !

मुंबई – दादर येथील शिवाजी पार्क येथून २९ जानेवारी या दिवशी सकल हिंदु समाजाच्या वतीने हिंदु जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने हिंदु बंधू-भगिनी सहभागी झाल्या होत्या. राज्यात लवकरात लवकर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा आणावा, अशी मागणी या मोर्च्यामध्ये करण्यात आली.

मोर्च्यात सहभागी हिंदू


भाजपचे आमदार आशिष शेलार, तसेच भारती लवेकर, मनीषा चव्हाण आदी लोकप्रतिनिधी मोर्च्यात सहभागी झाले होते. विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था यांसह स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्च्यात सहभागी झाले होते.

Leave a Comment