देवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत कोणती ?

देवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत कोणती याविषयी आपण या लेखातून जाणून घेऊया. तसेच देवळात प्रवेश करण्यापूर्वी, प्रवेश केल्यानंतर आणि देवळातून बाहेर पडतांना करावयाच्या कृती समजून घेऊया.

१. देवळात प्रवेश करण्यापूर्वी शक्य असल्यास पाय धुवावेत.

२. देवळाच्या आवारातून कळसाला नमस्कार करावा.

३. देवळाच्या पायर्‍या चढतांना उजवा हात लावून पायरीला नमस्कार करावा.

४. ‘देवतेला जागृत करत आहोत’, या भावाने घंटा अतिशय हळू वाजवावी.

५. देवतेची मूर्ती आणि तिच्यासमोर असलेली कासवाची प्रतिकृती (शिवाच्या देवळात नंदीची प्रतिकृती) यांच्यामध्ये उभे न रहाता किंवा बसता, प्रतिकृतीच्या बाजूला उभे राहून हात जोडून विनम्रतेने दर्शन घ्यावे.

याविषयीची अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा !

६. देवतेच्या चरणांशी दृष्टी ठेवून लीन व्हावे. देवतेच्या छातीशी मन एकाग्र करावे. शेवटी देवतेच्या डोळ्यांकडे पाहून तिचे रूप डोळ्यांत साठवावे.

७. देवतेला अर्पण करावयाची वस्तू (उदा. फुले) देवतेच्या अंगावर न फेकता तिच्या चरणांवर अर्पण करावी.

८. मूर्ती दूर असेल, तर ती वस्तू देवतेसमोरील ताटात ठेवावी.

९. ‘देवतेच्या चरणी लीन होत आहोत’, या भावाने नमस्कार करावा.

१०. दोन्ही हात जोडून भावपूर्ण नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात. सर्वसाधारणत: देवांना सम संख्येने आणि देवींना विषम संख्येने प्रदक्षिणा घालाव्यात.

११. देवळात बसून थोडा वेळ नामजप करावा. प्रसाद शक्यतो देवळात बसूनच ग्रहण करावा.

१२. निघण्यापूर्वी देवतेला नमस्कार करून ‘तुझी कृपादृष्टी माझ्यावर सदैव असू दे’, अशी प्रार्थना करावी.

१३. देवळातून बाहेर पडत असतांना देवतेकडे आपली पाठ एकदम होणार नाही, याची काळजी घ्यावी.

१४. देवळातून बाहेर पडल्यावर आवारातून परत एकदा कळसाला नमस्कार करावा आणि मग प्रस्थान करावे.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘देवळात दर्शन कसे घ्यावे ?’

3 thoughts on “देवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत कोणती ?”

 1. सनातन संस्थाचे मासीक असल्यास कींवा माझ्या व्हाटस् पर माहिती पाठवावी

  Reply
  • नमस्कार श्री. दामोधर मिस्त्रीजी,

   कृपया सनातनचे android app ‘गुगल प्लेस्टोअर’च्या पुढील लिंक वरून डाऊनलोड केल्यास आपल्याला भ्रमणभाषवर (mobile वर) नियमित माहितीपर notification मिळतील. तसेच आमच्या टेलिग्राम चैनल ला subscribe करू शकता.
   Marathi Telegram Channel – t.me/SSMarathi
   English/ Hindi Telegram Channel – t.me/SanatanSanstha

   आपली,
   सनातन संस्था

   Reply

Leave a Comment