देवळात दर्शन घेण्याचे महत्त्व

देवळातील सगुण देवाचे दर्शन घेतल्यामुळे जिवाचे सगुणातून निर्गुणाकडे जाण्यासाठी प्रयत्न होतात. देवळाच्या वैशिष्ट्यपूर्ण संरचनेमुळे ईश्वरी तत्त्वाच्या निर्गुण लहरींचे रूपांतर सगुण लहरींत होते. त्यामुळे देवळात प्रवेश करणार्‍याला देवतेच्या सगुण तत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ होतो. यादृष्टीने या लेखात आपण देवळात दर्शन घेण्याचे महत्त्व, देवळाच्या रचनेतील सात स्तर, त्यांच्याशी संबंधित तत्त्वे आणि त्यांचे महत्त्व यांविषयी पहाणार आहोत.

१. देवळात दर्शन घेणे म्हणजे सगुणातून निर्गुणापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करणे

१ अ. ‘देवळात दर्शन घेणे म्हणजे जिवाने सगुण कृतींचे आलंबन करून, देवाच्या सूक्ष्म-लोकात जाऊन, निर्गुण-सगुण माध्यमाचा उपयोग करून, देवतेची उपासना करून, कृतीच्या स्तरावरील साधना करून, स्वतःची आध्यात्मिक उन्नती करणे होय.

१ आ. देवळात दर्शन घेणे म्हणजे प्रत्यक्ष ईश्वरी ऊर्जेच्या सगुण उपासनेच्या माध्यमातून ईश्वराचा साक्षात्कार करून, अनुभवातून बोध घेऊन देवतेचा कृपाशीर्वाद मिळवून सगुण रचनेच्या माध्यमातून ईश्वरी कृपा-ऊर्जेची उपासना चालू करून निर्गुणापर्यंत जाण्यासाठी टप्प्याटप्प्याने प्रयत्न करणे.’

– एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ४.१.२००७, सायं. ६.५०)

 

२. देवळात दर्शन घेण्याच्या प्रक्रियेमुळे होणारी व्यष्टी आणि समष्टी साधना

‘देवळात दर्शन घेण्याची प्रक्रिया ही व्यष्टी साधनेतून होणारी समष्टी साधना आणि समष्टी कार्यरूपातून व्यष्टी उद्देश साध्य करणारे स्थूलरूपी कार्य आहे; म्हणून देवळात दर्शन घेतल्यामुळे जिवाची व्यष्टी अन् समष्टी अशी दोन्ही प्रकारची साधना होते.

२ अ. व्यष्टी साधना

देवतेचे दर्शन घेण्याच्या प्रक्रियेत जिवाच्या व्यष्टी रूपाच्या अनुषंगाने त्याचा सगुणातून निर्गुणाच्या दिशेस प्रवास होत असतो.

२ आ. समष्टी साधना

देवळात दर्शन घेण्याच्या प्रक्रियेतून जिवाच्या व्यष्टीरूपी प्रांजळ कर्मक्रियेतून समष्टीसाठी आवश्यक असलेली कर्मरूपी साधना अप्रत्यक्षपणे होत असते. त्यामुळे देवळात जिवाची व्यष्टीरूपाशी निगडित साधना ही जरी प्रत्यक्ष दृश्यमय कर्मरूपाच्या माध्यमातून झाली, तरी अप्रत्यक्ष कर्मरूपातून त्याच्याकडून समष्टी साधनाच होत असते. त्यामुळे जिवाला देवळात दर्शन घेतल्यावर व्यष्टीसह समष्टी साधनेचाही लाभ होतो.’ – श्री गुरुतत्त्व (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १२.२.२००७, रात्री ८.४२)

 

देवळाच्या रचनेतील सात स्तर, त्यांच्याशी संबंधित तत्त्वे आणि त्यांचे महत्त्व

स्तर देवळाच्या रचनेतील भाग पंचतत्त्वांपैकी
संबंधित तत्त्व
दर्शन घेणार्‍याचा कोणता
देह आणि कोष यांची शुद्धी होते ?
पहिला प्रवेशद्वार आणि व्याघ्रमुख पृथ्वी स्थूलदेह
दुसरा आवार आणि तुळशीवृंदावन पृथ्वी अन् आप प्राणदेह अन् प्राणमयकोष
तिसरा जलकुंड आणि दीपमाळ आप आणि तेज मनोमयकोष
चवथा क्षेत्रपालदेवतेचा चौथरा आणि
महाद्वार
तेज प्राणमयकोष आणि
मनोमयकोष
पाचवा प्रदक्षिणामार्ग, पायर्‍या आणि
सभागार (आरसा, घंटा अन् छत)
वायू सूक्ष्मदेह
सहावा गर्भागार, यज्ञकुंड आणि
सूर्यनारायणाची मूर्ती
वायू आणि
आकाश
सूक्ष्मदेह आणि प्राणदेह
सातवा गाभारा, नंदादीप, देवळी, गोमुख,
कळस आणि कळसावरील ध्वज
आकाश स्थूलदेह आणि सूक्ष्मदेह

 

`देवळाच्या रचनेच्या सातही स्तरांतील घटकांमध्ये ब्रह्मांडातील पंचतत्त्वांपैकी ती ती तत्त्वे आकृष्ट करून घेण्याची, तसेच दर्शनार्थ्याच्या त्या त्या चक्राची शुद्धी करण्याची क्षमता आहे. देवळाच्या रचनेचे सात स्तर हे अनुक्रमे दर्शनार्थ्याच्या मूलाधारचक्रापासून सहस्रारचक्रापर्यंतच्या शुद्धीचा प्रवास दर्शवतात.

देवळाच्या वैशिष्ट्यपूर्ण संरचनेमुळे सातवा स्तर (निर्गुणाशी संबंधित आकाशतत्त्व) ते पहिला स्तर (सगुणाशी संबंधित पृथ्वीतत्त्व), म्हणजेच देवळाच्या कळसापासून प्रवेशद्वारापर्यंत, ईश्वरी तत्त्वाच्या निर्गुण लहरींचे रूपांतर सगुण लहरींत होते. त्यामुळे देवळात प्रवेश करणार्‍या जिवाला देवतेच्या सगुण तत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ होण्यास साहाय्य होते.

दर्शनार्थ्याला ईश्वरप्राप्ती होण्याच्या दृष्टीने हिंदूंच्या देवळाच्या रचनेमागे किती सूक्ष्म विचार केला आहे, हे यावरून लक्षात येते. या पार्श्वभूमीवर अन्य पंथियांच्या प्रार्थनास्थळांच्या रचनेमागे इतका सूक्ष्म विचार झालेला दिसून येत नाही. हिंदु धर्म अन्य पंथांच्या तुलनेत किती श्रेष्ठ आणि परिपूर्ण आहे, हेही यावरून लक्षात येते.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १६.१.२००५, रात्री १०.१९)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘देवळात दर्शन कसे घ्यावे ?’

Leave a Comment