रामनाथी, गोवा येथील चैतन्यदायी सनातन आश्रमात सेवानंद अनुभवण्याची अमूल्य संधी !
अन्नपूर्णा कक्षातील सेवेमुळे तनासह मनाचाही त्याग होतो. ही सेवा करून शीघ्रतेने आध्यात्मिक उन्नती केलेल्या अनेक साधकांची उदाहरणे आहेत. त्यामुळे साधकहो, या सेवेतून जलद आध्यात्मिक उन्नती करण्याची भगवंताने दिलेली ही संधी दवडू नका !
‘रामनाथी येथील सनातनचा आश्रम म्हणजे चैतन्याचा स्रोत ! रामनाथी आश्रमात आल्यामुळे केवळ साधकांनाच नव्हे, तर वाचक, हितचिंतक, जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांनाही साधनेत मार्गदर्शन मिळते. त्यामुळे ठिकठिकाणांहून अनेक जण आश्रमभेटीसाठी येतात. सध्या पूर्णवेळ साधनेसाठी रामनाथी आश्रमात येणाऱ्या साधकांचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे अन्नपूर्णा कक्षातील (स्वयंपाकघरातील) विविध सेवांसाठी साधकसंख्या अपुरी पडत आहे.
सनातनचा रामनाथी आश्रम म्हणजे चैतन्याचा स्रोत ! रामनाथी आश्रमातील साधकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अन्नपूर्णा कक्षातील (स्वयंपाकघरातील) विविध सेवांसाठी साधकसंख्या अपुरी पडत आहे. या सेवा करण्यासाठी शारीरिक क्षमता असलेल्या स्त्री आणि पुरुष साधकांची आवश्यकता आहे. यात पुरुष साधकांची प्राधान्याने आवश्यकता आहे. इच्छुक साधक पूर्णवेळ अथवा न्यूनतम २० दिवस आश्रमात राहून सेवेच्या या संधीचा लाभ घेऊ शकतात. ही सेवा करू शकणार्या किंवा शिकून घेण्याची सिद्धता असलेल्या साधकांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून बाजूच्या सारणीनुसार आपली माहिती पाठवावी.
नाव : सौ. भाग्यश्री सावंत
संगणकीय पत्ता : [email protected]
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१’


एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
सनातनच्या आश्रमांत पावसाळ्याच्या पूर्वसिद्धतेसाठी खालील साहित्याची आवश्यकता !